Fadnavis In Assembly Session: एकनाथ शिंदे, अजितदादा अन्‌ मी २०१९ चे हिरो आहोत; फडणवीसांनी उलगडला निवडणुकीनंतरचा पट

Devendra Fadnavis News: जी जबाबदारी मिळाली आहे, त्यात मी अतिशय आनंदी आहे. काम करण्यात मजा येत आहे.
Fadnavis In Assembly Session: एकनाथ शिंदे, अजितदादा अन्‌ मी २०१९ चे हिरो आहोत; फडणवीसांनी उलगडला निवडणुकीनंतरचा पट

Mumbai News : खरं म्हणजे २०१९ या वर्षात अनेकांनी अनेक विक्रम केले. एक विक्रम तर आमच्या मुख्यमंत्र्यांचा आहेच. त्यांनी ज्या पद्धतीने सत्तापरिवर्तन करत मुख्यमंत्री म्हणून कारभार चालवत आहेत, त्यामुळे २०१९ मधील हिरो तेच आहे. दुसरे हिरो आमचे अजितदादा आहेत. दोनवेळा उपमुख्यमंत्री, त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत. दादांच्या खालोखाल मी आहे. ही मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता आणि आता उपमुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतरचा राजकीय पट उलगडला. (Eknath Shinde, Ajitdada and me are the heroes of 2019 : Devendra Fadnavis)

विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या अभिनंदनाच्या ठरावावर उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, खरं म्हणजे २०१९ या वर्षात अनेक लोकांनी अनेक विक्रम केले आहेत. एक विक्रम तर आमच्या मुख्यमंत्र्यांचा (Eknath Shinde) आहेच. त्यांनी ज्यापद्धतीने सत्तापरिवर्तन केलं आणि मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने ते कारभार चालवत आहेत, त्यामुळे २०१९ मधील हिरो तेच आहेत. पण त्यासोबत २०१९ मधील आमचे हिरो अजितदादा (Ajit Pawar) आहेत. कारण, दादा पहिल्यांदा माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत.

Fadnavis In Assembly Session: एकनाथ शिंदे, अजितदादा अन्‌ मी २०१९ चे हिरो आहोत; फडणवीसांनी उलगडला निवडणुकीनंतरचा पट
Fadnavis Offer To Thopte : संग्राम थोपटेंसाठी फडणवीसांची ‘सत्यजित तांबे लाईन’; म्हणाले, ‘नाही तर आम्हाला न्याय द्यावा लागेल’

अजितदादांच्या खालोखाल मी आहे. कारण मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विरोधी पक्षनेता झालो, आता उपमुख्यमंत्री झालो. आता काही बदल होणार नाही, हे लक्षात ठेवा. आता आम्ही तिघंही ज्या पदावर आहोत, त्याच पदावर राहणार आहोत आणि निश्चितपणे अतिशय उत्तम काम करणार आहोत. त्यामुळे जी जबाबदारी मिळाली आहे, त्यात मी अतिशय आनंदी आहे. काम करण्यात मजा येत आहे. चांगले सहकारी मिळालेले आहेत. त्यात काहीही वावगं वाटत नाही, असंही फडणवीसांनी सांगून टाकलं.

Fadnavis In Assembly Session: एकनाथ शिंदे, अजितदादा अन्‌ मी २०१९ चे हिरो आहोत; फडणवीसांनी उलगडला निवडणुकीनंतरचा पट
Eknath Shinde In Assembly Session: नाना पटोलेंचा राजीनामा ‘ये अंदर की बात है’; मुख्यमंत्र्यांचे सत्ताबदलावर नेमके बोट....

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याची मोठी मांदियाळी पहायला मिळते. अनेक विरोधी पक्षनेत्यांनी जनसामन्यांच्या भल्यासाठी अनेक चांगले निर्णय करून घेतले. चुकलं तर सरकारला धारेवरही धरलं. राज्याच्या हिताचे अनेक प्रस्ताव एकदिलाने मंजूर झाले आहेत. त्याच्या विरोधी पक्षनेतेपदावर विजय वडेट्टीवार बसले आहेत. या पदाचा मानसन्मान वाढविण्यासाठी निश्चितपणे चांगलं काम करतील.

Fadnavis In Assembly Session: एकनाथ शिंदे, अजितदादा अन्‌ मी २०१९ चे हिरो आहोत; फडणवीसांनी उलगडला निवडणुकीनंतरचा पट
Solapur Loksabha : लोकसभेसाठी इच्छूक अमर साबळेंवर सोलापुरातील भाजपच्या हॅट्‌ट्रीकची जबाबदारी!

विजय वडेट्टीवार यांना माईकची गरज पडत नाही. त्यांचा आवाज कुठल्याही माईकपेक्षा अधिक आहे. (मध्येच नाना पटोले यांनी सुधीरभाऊंचा आवाज मोठा आहे ना, असे म्हटले. त्यावर सुधीरभाऊ आणि वडेट्टीवार या दोघांमधील चंद्रपूरमधील कॉम्पिटेशन आहे. सुधीरभाऊही एक किलोमीटरवरून आले आहेत, असे आपल्याला लक्षात येतं. त्यांचा आवाज येते, असे फडणवीसांनी सांगितले.) त्यामुळे वडेट्टीवार हे बुलंद आवाज आहेत, अशा शब्दांत त्यांनी वडेट्टीवार यांचे कौतुक केले.

फडणवीस म्हणाले की, विदर्भ आणि ओबीसीच्या प्रश्नावर त्यांनी लढा दिलेला आहे. राजकारणातील वारसा वडिलांकडून मिळाला आहे. त्यांचे वडिल नामेदवराव वडेट्टीवार हे गुणपिपरी तालुक्यातील करंजे गावचे सरपंच होते. अत्यंत धडाडीने निर्णय घेणारे सरपंच म्हणून त्याकाळी त्यांची ओळख हेाती. वरकणी वडेट्टीवार आक्रमक असले तरी आतून मृदू, संबंध आणि मैत्री जपणारे आहेत. विरोधी पक्षनेत्याला आक्रमता लागते. पण वास्तवाचे भान ठेवून माघार कुठे घ्यायचे भान ठेवावे लागते. कधी कधी सभागृहाचे कामकाज बंदही पाडावे लागते. पण ते वारंवार बंद पाडल्यामुळे विरोधी पक्षाचे जास्त नुकसान होते, हेही लक्षात ठेवावं लागतं.

Fadnavis In Assembly Session: एकनाथ शिंदे, अजितदादा अन्‌ मी २०१९ चे हिरो आहोत; फडणवीसांनी उलगडला निवडणुकीनंतरचा पट
Nitin Desai To Eknath Shinde : नितीन देसाईंची 'ऑडिओ क्लिप' आली समोर; राज्य सरकारला केले 'हे' आवाहन

नारायण राणेंसोबत विजय वडेट्टीवारही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. त्या पोटनिवडणुकीत त्यांना पाडण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या विरोधात प्रचारासाठी गेलो होतो. पण, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता, त्यामुळे ते पोटनिवडणुकीत निवडून आले. पुढे २०१४ मध्ये चिमूरऐवजी ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत जिंकली आहे. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातही ते राज्यमंत्री झाले. चंद्रपूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होते. तसेच, विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर एक अधिवेशनापुरते ते विरोधी पक्षनेतेही झाले होते, असे ही फडणवीस यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com