
What is the ₹3000 Fastag Annual Pass : देशभरातील टोलनाक्यांवरील गर्दी कमी करणे, विलंब टाळणे अन् वाहन चालकांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. त्यांनी तीन हजार रुपये किंमतीच्या वार्षिक फास्टॅग पास देणार असल्याचे जाहीर केले आहे. ही योजना वाहन चालकांच्या फायद्याची असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. पण या योजनेवर खूश होण्याआधी त्याचे नेमके फायदे-तोटे समजून घ्या.
नितीन गडकरी यांनी सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट करत योजनेची माहिती दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे. त्याआधी योजनेचा फायदा नेमका कुणाला, किती होणार, कोणत्या मार्गांवर हा पास ग्राह्य धरला जाईल, कोणत्या वाहनांचा या योजनेत समावेश असेल, हे समजून घेऊयात.
योजनेमध्ये गडकरी यांनी तीन हजार रुपये किंमतीचा पास वर्षभरासाठी दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचबरोबर 200 ट्रिपची अटही घातली आहे. या ट्रिप म्हणजे राष्ट्रीय महामार्ग किंवा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असलेल्या महामार्गांवरून तुम्ही आपले खासगी वाहन घेऊन जात असाल तरच तुम्हाला टोलवर पासचा वापर करता येईल.
त्याचप्रमाणे या महामार्गांवर प्रवासादरम्यान तुम्हाला जेवढे टोलप्लाझा लागतील, तेवढ्या ट्रिप 200 मधून वजा होणार आहेत. म्हणजे तुम्ही पुण्यातून कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे असा प्रवास महामार्गाने केल्यास या मार्गावर तुम्हाला सहा टोलप्लाझा लागल्यास 200 मधून सहा ट्रिप वजा होईल. केवळ खासगी कार, जीप, व्हॅन आदी वाहनांनाच हा पास उपलब्ध होणार आहे.
राज्य सरकारने उभारलेल्या मार्गांवर किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणातील टोलप्लाझांवर वार्षिक पासचा उपयोग होणार नाही, हे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृध्दी महामार्ग अशा महत्वाच्या मार्गांसह अनेक मार्गांवर टोल द्यावा लागतो. या मार्गांवर नितीन गडकरी यांच्या योजनेचा फायदा घेता येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.