Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकात खर्गेंचा करिश्मा; नेतृत्वावर शिक्कामोर्तब; विजयानंतर परसेप्शन बदलणार

Mallikarjun Kharge News : कर्नाटकच्या विजयाने त्यांच्यासाठी अनेक गोष्टी बदलतील.
Mallikarjun Kharge News
Mallikarjun Kharge NewsSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस पक्षातील एका नेत्याची उंची वाढली आहे. काँग्रेसचे नेतृत्व करताना तुम्हाला परसेप्शनची लढाई जिंकावी लागते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही हे करावे लागले आहे. कर्नाटकच्या विजयाने त्यांच्यासाठी अनेक गोष्टी बदलतील.

खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना गांधी घराण्याच्या हातचे बाहुले म्हणून अवहेलना झाली होती. कर्नाटक हे खर्गे यांचे राज्य आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्टेची होती. ही निवडणूक खर्गे यांनी मोठ्या बहुमताने जिंकली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच परसेप्शनच्या लढाईत ते मजबूत झाले आहेत.

Mallikarjun Kharge News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

कर्नाटक निवडणुकीतील विजयासह खर्गे यांनी परसेप्शनच्या लढाईतील आपली प्रतिमा अधिक मजबूत केली. खर्गेंनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपने (BJP) त्यांच्यावर टीका केली होती. ते केवळ नामधारी अध्यक्ष असल्याची टीका त्यांच्यावर केली जात होती. खर्गे केवळ रबर स्टँप असून, गांधी कुटुंबाचाच शब्द शेवटचा असेल, असा आरोप भाजपने केला होता.

खर्गे यांना अजिंक्य योद्धा म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी एस. एम. कृष्णा, धरम सिंह व सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्री पदामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. कर्नाटक निवडणुकीत खर्गे अत्यंत आक्रमक पद्धतीने उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेली प्रत्येक टीका त्यांनी अत्यंत हुशारीने परतावून लावली होती. यासाठी त्यांनी आपल्या प्रतिमेचा चपखल वापर केला.

Mallikarjun Kharge News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयांमध्ये 'ही' रणनिती ठरली महत्त्वाची; भाजपच्या आत्याधुनिक यंत्रणेला पहिल्यांदाच दिला छेद

मल्लिकार्जुन खर्गेंनी (Mallikarjun Kharge) पंतप्रधान मोदींना विषारी सापाची उपमा दिली. यावरून भाजपने काँग्रेसची (Congress) कोंडी करण्याचा प्रयत्न केला होती. मात्र, खर्गेंनी अत्यंत चातुर्याने ही कोंडी फोडली. त्याचा फायदा काँग्रेसला प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात झाला. या विजयामुळे विरोधकांवरही परिनाम होणार असला तरीही काँग्रेस पक्षाअंतर्गतही खर्गे यांच्या नेतृत्वाचा दबदबा निर्माण होणार आहे. यामुळे खर्गे यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे.

निकालानंतर खर्गे म्हणाले, काँग्रेसचा विजय हा जनतेचा विजय आहे. जनतेने भ्रष्ट सरकारचा पराभव केला आहे. आपल्याला पुढे खूप काही करायचे आहे. आम्हाला आमची आश्वासने पूर्ण करायची आहेत, आम्ही आमच्या 5 आश्वासनांची पूर्तता करू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com