Narayan Rane : राणेसाहेब, आपण केलेले सलोख्याचे आवाहन स्वागतार्ह, मात्र आपल्या आमदार पुत्राचे काय?

Narayan Rane stance on the reservation issue : आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील सलोखा संपुष्टात येऊ नये, ही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भूमिका स्वागतार्ह आहे. त्याचवेळी आपले आमदार पुत्र नितेश राणे धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी कशी चिथावणीखोर वक्तव्ये करत असतात, याकडेही त्यांनी लक्ष दिले तर ते राज्याच्या हिताचेच ठरेल.
Narayan Rane- Nitesh Rane
Narayan Rane- Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. आरोप -प्रत्यारोप होत आहेत. याबाबत माजी मुख्यमंत्री,भाजपचे खासदार नारायण राणे यांनी चिंता व्यक्त केली आहे. राजकारण थांबवा, सलोखा राखा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राणे यांच्या आवाहनाचे स्वागतच केले पाहिजे.मात्र आपला आमदार असलेला पुत्र काय काय बोलतो, दोन धर्मांत तेढ निर्माण करणारी वक्तव्ये का करतो,याकडे नारायण राणे यांनी लक्ष दिले असेल का,असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आमदार नितेश राणे यांची ओळख आता प्रक्षोभक भाषणांसाठी होऊ लागली आहे.दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल,अशी भडक विधाने ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकारण कदाचित साध्य होईल, मात्र समाजात निर्माण होऊ घातलेली संभाव्य दुही धोकादायक ठरू शकते. पोलिसांबद्दल बोलतानाही त्यांची जीभ घसरली आहे.

सोलापूर येथील सभेत त्यांनी दोन समाजांत तेढ निर्माण हईल, असे विधान केले होते. अकोला येथील एका कार्यक्रमात त्यांनी, पोलिस माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत, कारण माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे,असे विधान त्यांनी केले होते.सागर बंगला हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान आहे.

Narayan Rane- Nitesh Rane
Narayan Rane : आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद टोकाला; राणेंना झाली थेट शिवाजी महाराजांची आठवण, म्हणाले...

कराड येथील मुजावर कॉलनीत 25 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी स्फोट झाला होता. त्यात पती-पत्नीचा मृत्यू झाला. तो बॉम्बस्फोट होता, बॉम्बची चाचणी करताना स्फोट झाला होता, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी त्यावेळी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन केला होता. लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे तो प्रकार दाबण्यात आला.

हिवाळी अधिवेशनात त्या लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करणार असल्याचे आमदार राणे यांनी म्हटले होते. हे प्रकरण अधिवेशनात लावून धरणार, असे संकेत त्यांनी दिले होते. या प्रकरणाची चौकशी दहशतवादविरोधी पथकामार्फत करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्या स्फोटाबाबत फोरेन्सिक लॅबचा अहवाल आला आणि गॅस सिलींडरच्या गळतीमुळे तो स्फोट झाला होता, असे त्या अहवालात म्हटले होते.

नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अशा चिथावणीखोर विधानांची लांबलचक यादीच होईल.नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री आहेत. त्यांनी केंद्रातही मंत्री म्हणून काम केले आहे. विरोधकांवर टीका टिपण्णी सजू शकते,मात्र नितेश राणे हे सतत चिथावणीखोर वक्तव्ये करत असताना एक जबाबदार राजकीय नेते, जबाबदार वडील म्हणून नारायण राणे यांना काही वाटले नसेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता आरक्षणाच्या प्रश्नामुळे राज्यातील सलोखा धोक्यात येईल, अशी चिंता नारायण राणे यांना आहे,ती रास्त आहे. त्यांनी केलेले सलोखा राखण्याचे आवाहनी स्वागतार्ह आहे. एक जबाबदार राजकी नेते म्हणून त्या्ंनी त्यांचे कर्तव्य या आवाहनाद्वारे पार पाडले आहे. मग नितेश राणे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांचे काय,नारायण राणे यांची त्याबाबत काय भूमिका आहे, हे समोर आले पाहिजे.

Narayan Rane- Nitesh Rane
Video Sharad Pawar : मोठी बातमी! छगन भुजबळांच्या भेटीवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आमदार नितेश राणे राजकीय फायद्यासाठीच धार्मिक ध्रुवीकरण होईल, अशी वक्तव्ये करत असतात. विरोधकांवर बेछूट आरोप करणारे नितेश राणे चिधीवणीखोर विधानेही तशाच पद्धतीने करत असतात. त्याबाबतही नारायण राणे (Narayan Rane) यांनी कधीतरी बोलायले हवे होते, एक जबाबदार वडिल म्हणून मुलाचे कान पिळायला हवे होते. असे नाही की नितेश राणे हे भाजपमध्ये आल्यावरच अशी बेछूट विधाने करत आहेत.

काँग्रेसमध्ये असताना ते भाजपचे नेते, राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर कठोर टीका करायचे. त्याचे स्क्रीनशॉट विरोधक अधूनमधून सोशल मीडियावर टाकत असतात.आता ते भाजपमध्ये आहेत.भाजपमध्ये गेले की सरसकट एका विशिष्ट धर्मीयांच्या विरोधात भूमिका घ्यायची असा त्यांचा समज झाला असावा.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com