रुग्ण बनलेल्या अडसुळांवर ईडीचा खडा पहारा: दुसऱ्या रुग्णालयातही अधिकारी दाखल

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविले
Former MP Anandrao Adsul
Former MP Anandrao Adsul Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सक्तवसुली संचनालयाने (ईडी) त्यांचे घर आणि कार्यालयावर छापा टाकल्यानंतर त्यांना मुंबईच्या गोरेगाव येथील लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर गेली चार दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आता एसव्हीएस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या रुग्णालयात शिफ्टिंग करताना ईडीचे अधिकारीही अडसूळ यांच्यासोबत होते. (Former MP Anandrao Adsul was shifted to another hospital)

सिटी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी ईडीने माजी खासदार अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजित यांना समन्स पाठवले होते. ईडीने २७ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर अडसूळ यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गोरेगाव येथील लाईफलाईन केअरमध्ये गेली चार दिवसांपासून उपचार सुरू होते. पण, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, त्यामुळे त्यांना आज दुपारी एसव्हीएस रुग्णालयात दाखल केले आहे.

Former MP Anandrao Adsul
'थोडी तरी शरम करा' ; किशोरी पेडणेकरांवर शेलारांचा हल्लाबोल

विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून ईडीचे काही अधिकारी हे अडसूळांवर लाईफ लाईन रुग्णालयात बसून देखरेख ठेवत होते. आज अडसूळांना दुसऱ्या रुग्णालयात हलवितानाही ईडीचे अधिकारी आणि कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. त्यामुळे रुग्णालयात ईडीचे अधिकारी हे अडसूळांची पाठ सोडेनात, अशी परिस्थिती आहे.

आमदार रवी राणांची तक्रार

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ हे सिटी बँकेचे अध्यक्ष असताना बँकेत ९०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यावेळी त्यांचे नातेवाईकही बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याच कालावधीत कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून सिटी बँक बुडीत आहे. खातेदार अडसुळांना अनेकदा भेटले. पण, त्यांच्या तक्रारी अडसूळांनी गांभीर्याने घेतल्या नव्हत्या, असा त्यांच्यावर आरोप आहे, असे आमदार रवी राणा यांनी ईडीकडे केलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे. त्यानंतर अडसूळ यांच्या मागे ईडीचा फेरा लागला आहे.

Former MP Anandrao Adsul
नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताच काँग्रेसला बसला पहिला मोठा धक्का

अटक टाळण्यासाठी अडसूळ हायकोर्टात

दरम्यान, अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी आनंदराव अडसूळ यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले आहे. त्यावर आज तातडीने सुनावणी करण्यात आली आहे. त्यात अडसूळ यांच्या वकीलांनी मागणी केली की, याचिकाकर्ता वयस्कर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानासुद्धा ईडीचे अधिकारी रुग्णालयाबाहेर ताबा घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेले उपचार लक्षात घेता त्यांना अटक करू नये, अशी मागणी अडसूळ यांच्या वकिलांनी केली आहे.

दरम्यान, हे प्रकरण गंभीर आहे. अडसूळ यांनी त्यांच्या राजकीय ओळखीचा उपयोग करून ते अॅडमिट झाले आहेत. ईडीचे अधिकारी समन्स घेऊन जाताच अडसूळ हे आजारी पडले आणि त्यांनी स्वतःला रुग्णालयात एडमिट करून घेतलं आहे, असा आरोप ईडीच्या वकिलांनी केला आहे. तसेच, संशयित आरोप असलेले अडसूळ न्यायालयाची पायरी चढतात, याचिका दाखल करतात आणि दिलासा मागण्याचा प्रयत्न केला जातो. मग, संशयिताची चौकशी कशी करायची, ईडीचे अधिकारी काम कसं करणार, असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयात आज सुनावणीत अडसूळांना दिलासा मिळालेलाच नाही. त्यावर उद्या आणखी सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com