फडणवीसांच्या मोहिमेला अशोक चव्हाणांकडून धक्का; खतगावकरांची मनधरणी अयशस्वी

खतगावकरांचा दांडगा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची मोठी फळी या मतदारसंघात आहे.
Bhaskarrao Patil Khatgaonkar, Devendra Fadnavis
Bhaskarrao Patil Khatgaonkar, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. जेष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. त्याच बरोबर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil) हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते आहेत. ते भाजपमध्ये नाराज होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांची मनधरणी केली होती. मात्र, त्यानंतरही खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अतिवृष्टी पाहणीनिमित्ताने नांदेड दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर खतगावकर यांच्या राजेंद्रनगर नांदेड येथील निवासस्थानी ३ ऑक्टोबरला जाऊन भेट घेतली होती. या भेटीत पोटनिवडणुकीसंबंधी फडणवीस व भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात बंद खोलीत अर्धातास चर्चा झाली होती. त्यावेळी फडणवीस खतगावकरांची मनधरनी करण्यात यशस्वी झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, खतगावकरांच्या काँग्रेस प्रवेशामुळे फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे.

Bhaskarrao Patil Khatgaonkar, Devendra Fadnavis
देगलूर पोटनिवडणूक : चार निवडणुकांत ४४ जणांनी नशीब आजमावले ; यश दोन घराण्यातच

भाजपने देगलूर-बिलोली पोटनिवणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवार दिली आहे. तर कॉंग्रेसने जितेश अंतापूरकरांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने शिवसेनेच्या माजी आमदारांना उमेदवारी दिल्याने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, अशोक चव्हाण यांनी खतगावकरांना फोडून भाजपला चांगलेच अडचणीत आणले आहे.

Bhaskarrao Patil Khatgaonkar, Devendra Fadnavis
काँग्रेसने उधळले, एकनाथ खडसे- गिरीश महाजनांचे राजकीय इमले

बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आजपर्यंत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी या भागाचे तीन वेळा आमदार व तीन वेळा खासदार म्हणुन नेतृत्व केले आहे. खतगावकर हे ज्या उमेदवाराच्या पाठीमागे आपली ताकत उभी करतील तोच उमेदवार निवडून येतो. खतगावकरांचा दांडगा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची मोठी फळी या मतदारसंघात आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तर पंढरपुरची पुनरावृत्ती देगलूर-बिलोली मतदारसंघात करणेही थोडे अवघड जाणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com