काँग्रेसची ताकद वाढणार! अपक्ष आमदार लवकरच पक्षाच्या तंबूत

काँग्रेसनेही (Congress) आता आक्रमक भूमिका घेत आमदारांना आपल्याकडे ओढून घेण्यास सुरवात केली आहे.
Congress

Congress

Sarkarnama

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील (Goa) राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, राजकीय फोडाफोडीला सुरवात केली आहे. काँग्रेसनेही (Congress) आता आक्रमक भूमिका घेत आमदारांना आपल्याकडे ओढून घेण्यास सुरवात केली आहे. आठवडाभरात दुसरा आमदार काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे.

अपक्ष आमदार प्रसाद गावकर (Prasad Gaonkar) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. सेंगुएम मतदारसंघाचे ते आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच गावकर यांनी दिल्लीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. मतदारसंघातील जनतेचा माझ्या निर्णयाला पाठिंबा असून, ते पुन्हा मला गोवा विधानसभेत पुन्हा पाठवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

याबद्दल बोलताना गावकर म्हणाले की, मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. पक्षाच्या तिकिटावरच मी निवडणूक लढवणार आहे. राज्यात पुढील सरकार काँग्रेसचेच असणार आहे. मी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी मला काँग्रेसकडून तिकिट देण्याचे आश्वासन दिले आहे. एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. राज्यातील जनतेने आता काँग्रेसला कौल देण्याचा निर्णय घेतला आहे.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
मतदानादिवशीच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत अडचणीत

गोव्यात विधानसभा निवडणुकीमुळे फोडाफोडीला जोर आला आहे. यात भाजपसह (BJP) तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आम आदमी पक्षाने (AAP) आघाडी घेतली होती. आता काँग्रेसही मैदानात उतरली असून, भाजपला पहिला धक्का दिला होता. मागील आठवड्यात भाजपचे आमदार कार्लोस अल्मेडा (Carlos Almeida) यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
दात फोडून टाकेन! जिल्हा बँकेचे अध्यक्ष अन् भाजप उमेदवारात पोलिसांसमोरच बाचाबाची

कार्लोस अल्मेडा हे दोन वेळा वास्को द गामा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. पक्षाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पुढे केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपमध्ये राहून सार्वजनिक जीवनात जनतेसाठी काम करणे अशक्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचे आणखी आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर असून, ते लवकरच राजीनामा देतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com