दात फोडून टाकेन! जिल्हा बँकेचे अध्यक्ष अन् भाजप उमेदवारात पोलिसांसमोरच बाचाबाची

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Satish Sawant and Pradnya Dhavan

Satish Sawant and Pradnya Dhavan

Sarkarnama

Published on
Updated on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व महाविकास आघाडीच्या पॅनेलचे प्रमुख सतीश सावंत आणि भाजप (BJP) उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा प्रकार सुरू होता.

या निवडणुकीत नारायण राणेंच्या (Narayan Rane) पॅनेलसमोर महाविकास आघाडीचे पॅनेल आहे. तहसील कार्यालयात सतीश सावंत आणि प्रज्ञा ढवण आज समोरासमोर आले. त्यावेळी सावंत आणि ढवण यांच्यात जोरदार शिवीगाळ झाली. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच दोघांमध्ये जोरदार जुंपली होती. ढवण यांनी शिव्या दिल्यानंतर सावंत यांनी त्यांना दात पाडण्याची धमकी दिली. या वेळी ढवण यांची कन्या व जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत याही उपस्थित होत्या. पोलिसांनी अखेर मध्यस्थी करीत दोघांना बाजूला नेऊन हा वाद मिटवला.

<div class="paragraphs"><p>Satish Sawant and Pradnya Dhavan</p></div>
राणेंना नोटीस येताच फडणवीसांनी वकिली बाणा दाखवत पोलिसांनाच आणलं अडचणीत

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर सोळा कोटीं रुपयांचे थकीत कर्ज आहे, त्यामुळे सहकार विभागाने त्यांचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय होणार आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दुसरीकडे आज या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवलीच्या ओम गणेश बंगल्यावर मुक्काम ठोकला आहे.

<div class="paragraphs"><p>Satish Sawant and Pradnya Dhavan</p></div>
सोरेन यांनी पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त केलं अन् लोक म्हणाले, आमच्याकडे असे मुख्यमंत्री नाहीत!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पॅनेलसमोर महाविकास आघाडीने (Maha vikas Aghadi) आव्हान उभे केले आहे. तर कुणीही कितीही प्रयत्न केला तरी या निवडणुकीत आपलेच पॅनेल विजयी होणार, असा विश्वास राणे गटाला आहे. तर मेडिकल कॉलेज आणि मोटारींसाठी घेतलेले कर्ज बुडवण्यासाठी राणे यांना बँकेवर ताबा हवा असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच नारायण राणे यांच्या ओमगणेश बंगल्यात हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकारी नारायण राणे यांच्या बंगल्यावर उपस्थित आहेत. या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले आहे. या संघर्षात कोण बाजी मारते त्याचा निर्णय 31 डिसेंबरला होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com