Maratha Reservation Special : लढा मराठा समाजाचा @ जालना : सरकारचे 'चाणक्यही फेल', जरांगेंची भूमिका ठाम... भाग-७

Jalna Maratha Protest : तिकडे ओबीसींचे आंदोलन राज्यभरात पेट घेत आहे, त्यामुळे इकडे आड अन् तिकडे विहीर अशी सरकारची गत झाली आहे.
Maratha Reservation Protest News
Maratha Reservation Protest NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, की कुठल्या पक्षाशी संबंध, तरीही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जेरीस आणले आहे. (Jalna Protest News) दरवेळी समिती नेमून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली सुटका करून घेणाऱ्या सरकारची जरांगे पाटील यांच्या आंदोलन आणि भूमिकेने मात्र पुरती कोंडी केली आहे. अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाच्या पंधराव्या दिवशी सरकारचा निरोप घेऊन आलेल्या शिष्टमंडळापुढे जरांगे यांनी पाच अटी ठेवत एक महिन्याचा वेळ देण्याचे मान्य केले आहे.

Maratha Reservation Protest News
Maratha reservation : मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने वेळकाढूपणा करू नये...

काय चौकशी करायची करा, जो अहवाल मागवायचा तो मागवा, पण महिनाभरानंतर सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि आरक्षण द्या. तोपर्यंत मी हटणार नाही, साखळी उपोषण सुरूच राहील. (Maratha Reservation) जरांगे यांच्या या भूमिकेने सरकार आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. जरांगे यांना उपोषण मागे घ्यायला लावणे हा सरकारचा मूळ उद्देश यामुळे साध्य होत नाही. (Marathwada) महिनाभराचा वेळ मिळाला असला तरी त्यानंतर आंदोलन, उपोषणाची टांगती तलवार सरकारच्या डोक्यावर कायम राहणार आहे. त्यामुळे या वेळी सुटका नाही, ठोस निर्णय घ्यावाच लागणार, अशी परिस्थिती आहे.

सीएम, डीसीएम येतील का?

तिकडे ओबीसींचे आंदोलन राज्यभरात पेट घेत आहे, त्यामुळे इकडे आड अन् तिकडे विहीर अशी सरकारची गत झाली आहे. उपोषण सोडतो पण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांनी यावे, अशी अटही जरांगे यांनी घातली आहे. (Jalna) यातून मराठा समाजाला विश्वास आणि आपण भूमिकेपासून तसूभरही हललेलो नाही हे जरांगे यांना दाखवून द्यायचे आहे. आंदोलकांवर दि. १ सप्टेंबर रोजी झालेल्या लाठीहल्ल्यामुळे चिघळलेले वातावरण अजून शांत झालेले नाही. अशावेळी जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री येतील का? हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी आज निरोप देतो असे सांगितले असले तरी ते येण्याची शक्यता कमीच आहे.

जरांगेंचा डाव आणि सरकार अडचणीत

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल समाजामध्ये संतापाचे वातावरण असल्यामुळे त्यांच्यापैकीदेखील कुणी येण्याची शक्यता वाटत नाही. जरांगे यांनादेखील कदाचित याची जाणीव असावी, पण त्यांनी हा डाव टाकत सरकारला आणखी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. उपोषण मागे घेतले म्हणजे आपण थांबलो असा त्याचा कुणी अर्थ लावू नये, यासाठीच जरांगे यांनी आजच दि. १२ ऑक्टोबर रोजी शंभर एकरमध्ये जगातली सर्वात मोठी सभा घेण्याचेदेखील जाहीर करून टाकले.

सरकारचे चाणक्यही 'फेल'

सरकारचे दोन्ही जीआर जरांगे यांनी नाकारल्यानंतर सरकारच्याच मागणीनुसार त्यांना एक महिन्याची वेळ देण्याची चलाखी जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. त्यामुळे एरवी कुठलेही आंदोलन आपल्या चाणक्यनितीने मोडून काढणाऱ्या सरकारमधील धुरिणांनीदेखील जरांगे यांच्यापुढे हात टेकल्याचे दिसून आले आहे. जरांगे यांनी दोन पाऊल मागे येत, मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. आता सरकार किती मागे जाते, हे महिनाभरानंतर होणाऱ्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल. तूर्तास १५ दिवसांच्या उपोषणाने जरांगे यांनी अर्धी लढाई जिंकली, असेच म्हणावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com