Chandwad Maratha News : मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची धग अद्यापही कमी होण्याची चिन्हे नाहीत. आता याबाबत विविध राजकीय पक्षांनीदेखील राज्य सरकारला इशारा दिला आहे. चांदवड येथे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. (congress leaders criticized State government on Maratha reservation issue)
चांदवड (Nashik) येथे मराठा (Maratha) समाजास आरक्षण मिळण्यासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांना चांदवड तालुका कॉंग्रेसतर्फे (Congress) पाठिंबा देण्यात आला. राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
याबाबत माजी आमदार शिरीष कोतवाल म्हणाले, शासनाला याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी वेळ देऊनही केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. यानंतरही मागण्यांची पूर्तता न झाल्यास राज्यात मराठा समाजातर्फे मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. या मागण्यांसाठी कॉंग्रेसने तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले.
ते पुढे म्हणाले, सर्वच मराठा समाज पुढारलेला नाही हे वास्तव सरकार कधी समजून घेणार, त्यामुळे या समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे. एकीकडे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. प्रत्येक मराठ्यामध्ये असंतोष निर्माण होत आहे.
शेतीमालाला भाव मिळत नाही. दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत आहे, याकडे शासनास लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे मराठा समाजास नोकरी, शिक्षणात व सर्व ठिकाणी आरक्षण देण्यात यावे, अन्यथा चांदवड तालुका काँग्रेसतर्फे मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
माजी आमदार कोतवाल, बाजार समितीचे सभापती संजय जाधव, कार्याध्यक्ष समाधान जामदार, प्रांतिक सदस्य भीमराव जेजुरे, शिवाजी कासव, संजय कोल्हे, नंदू कोतवाल, सुभाष जाधव, नितीन गुंजाळ, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष दीपांशू जाधव, आदेश शेळके, बापू शिंदे, निवृत्ती गुंजाळ, बाबाजी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.