ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा; 7130 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील 34 जिल्ह्यातील 4554 ग्रामंपचांतीमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Gram Panchayat election
Gram Panchayat electionsarkarnama

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यातील 4554 ग्रामंपचांतीमध्ये पोटनिवडणुकीचा (Gram Panchayat Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतीच्या एकूण 7130 रिक्त जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांसी पत्रव्यवहार केला आहे. इच्छूकांना 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीत विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुका पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाव्यात, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना करण्यात आल्या आहेत.

Gram Panchayat election
नोकरीच धोक्यात: एसटीनं 2300 कर्मचाऱ्यांना बजावली सेवा समाप्तीची नोटीस

नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापुर्वी त्या ग्रामपंचायतीचे एकूण आरक्षण 50 टक्क्याच्या मर्यादेत ठेवणे. नागरिकाच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्यापर्यत ठेवणे. आरक्षण मर्यादेची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येची गणणा विचारात घ्यावी, आदी सुचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार, नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेल्या रिक्त जागांचे सर्व साधारण जागत बदल करण्यासाठी अंतिम प्रभाग रचनेसाठी सुधारणा अधिसूचना 22 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

Gram Panchayat election
तिजोरीत खडखडाट अन् मंत्र्यांसह 54 अधिकाऱ्यांचं वऱ्हाड निघालं थेट दुबईला

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे -

उमेदवारी अर्ज मागवण्याचा व सादर करण्याची मुदत - 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर ( वेळ 11 ते दु.3 वाजेपर्यंत )

अर्ज छाननी - 7 डिसेंबर (सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यत)

अर्ज मागे घेण्याची तारीख - 9 डिसेंबर (दु. 3 वाजेपर्यंत )

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - 9 डिसेंबर (दु. 3वाजेपर्यत)

आवश्यक असल्यास मतदानाची तारीख - 21 डिसेंबर (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 )

मतमोजणी - 22 डिसेंबर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com