
Rahul Gandhi vs Arvind Kejriwal: Who Leads Now? -गुजरामधील दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने विसावदरमध्ये मोठा विजय मिळून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. यानंतरग आथा गुजरातमध्ये काँग्रेसचे जागा आप घेणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्यांमध्येही सुरू झाल्या आहेत.
भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने एक असा पराक्रम केला आहे, ज्याची राजकीय निरीक्षकांनाही फारशी अपेक्षा नव्हती. पोटनिवडणुकीत पक्षाने २०२२मध्ये जिंकलेली जागा केवळ राखलीच नाही तर विजयाचे अंतरही वाढवले आहे. यामधून गुजरातमध्ये भाजपशी कशाप्रकारे लढायचे हे सांगण्यात आप यशस्वी झाल्याचे आता बोलले जात आहे.
२००७मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते तेव्हा भाजपने विसावदरची जागा जिंकली होती. तेव्हापासून भाजपचे केशूभाई पटेल यांची ही जागा जिंकण्याचे कायम प्रयत्न होते, परंतु त्यांना यश आले नाही. आता विसावदरमध्ये आम आदमी पार्टीच्या विजयानंतर केजरीवाल यांच्या कुटनीतीची चर्चा अधिक होत आहे.
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी तीनदा गुजरातला भेट दिली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधींनी बब्बर शेर संबोधले, मात्र काँग्रेस नेते निवडणुकीच्या रिंगणात पक्षाची ताकद दाखवण्यात कमी पडल्याचे दिसून आले. याचा फायदा घेत उलट आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या तळागाळातील नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे आता काँग्रेसचं टेन्शनही अधिक वाढलं आहे.
विसावदरमध्ये आम आदमी पार्टीचा विजय खऱ्या अर्थाने मोठा आहे, कारण पोटनिवडणुकीत पक्षाचे भाजपचा पराभव केला. इतकच नव्हे तर विसावदरमध्ये आम आदमी पार्टीला ५१.०५ टक्के मतं मिळाली, तर काँग्रेसचे मात्र डिपॉझिटही जप्त झालं. काडीमध्ये भाजपने ५९.३९ टक्के मतं मिळवून विजय मिळवला. पंजाबमध्ये जिथे आप सत्तेत आहे तिथे पक्षाला ३९.०२ टक्के मतं मिळाली. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचा विजय मोठा आहे. म्हणूनच विजयानंतर आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रमुख इसुदान गढवी यांनी काँग्रेसमधील चांगल्या नेत्यांनी आम आदमी पार्टीत सहभागी व्हावे अशी खुली ऑफर दिली आहे. परिणामी गुजरातमध्ये आता हळूहळू आम आदमी पार्टी काँग्रेसची जागा घेणार का?असंही बोललं जात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparlhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.