Samajwadi Party News : ...अखेर समाजवादी पार्टीने ‘त्या’ तीन आमदारांना दाखवला बाहेरचा रस्ता!

Samajwadi Party expels Three MLAs - जाणून घ्या, नेमकं काय केलं होतं या आमदारांनी आणि हा कठोर निर्णय घेतल्यानंतर पक्षाने काय म्हटलं?
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Reason Behind Expulsion of SP MLAs- राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या तीन आमदारांवर समाजवादी पार्टीने अखेर दीड वर्षानंतर कारवाई केली आहे. पक्षाने रायबरेलीमधील उंचाहार येथील आमदार मनोज पांडे, अयोध्येतील गोसाईगंजचे आमदार अभय सिंह आणि अमेठीतील गौरगंज येथील आमदार राकेश प्रताप सिंह यांना पक्षातून काढले आहे.

समाजवादी पार्टीकडून सोमवारी याबाबत एक्स हँडलरवर या हकालपट्टीच्या कारवाईची माहिती दिली गेली आहे.  या आमदारांना जनहितार्थ पक्षातून काढण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. विशेष म्हणजे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या इतर पक्षांच्या चार आमदारांवर व राज्यसभेच्या मतदानास गैरहजर असणाऱ्या एका आमदारावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पंचायत निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून हा निर्णय घेतला गेला असल्याचे मानले जात आहे.

फेब्रुवारी २०२४मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने दहा जागांवर आठ उमेदवार उभा केले होते. तर समजावादी पार्टीने तीन उमेदवार उभा केले होते. निवडणुकीदरम्यान समाजवादी पार्टीचे आमदार मंत्री मनोज कुमार पांडे, राकेश प्रताप सिंह आणि अभय सिंह यांच्यासह विनोद चतुर्वेदी, राकेश पांडे, पूजा पाल आणि आशुतोष मौर्य यांनी भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले होते.

Akhilesh Yadav
Kolhapur Politics - कोल्हापूरातही एकनाथ शिंदेंचं 'मिशन टायगर' सुरूच ; आता भाजप अन् ताराराणी आघाडीचे नगरसेवकही गळाला?

माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या पत्नी आमदार महाराणी देवी देखील मतदानास गैरहजर होत्या. परिणामी समाजवादी पार्टीचे उमेदवार आलोक रंजन यांना पराभव पत्कारावा लागला, तर भाजपचे आठवे उमेदवार संजय सेठ हे विजयी झाले होते.

यानंतर लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत मनोज कुमार पांडे, अभय सिंह आणि राकेश प्रताप सिंह यांच्यासह अनेक आमदार भाजपच्या समर्थनात आहेत. या तीन आमदारांचे पक्षातून निलंबन करताना समाजवादी पार्टीने एक्सवर लिहिले की, जातीय आणि पीडीए विरोधी विचारसरणीला पाठिंबा दिल्याबद्दल या तीन आमदारांना पक्षाबाहेर काढले गेले. त्यांना विचार बदलण्यासाठी वेळ दिला गेला होता, मात्र आता त्याची मर्यादा संपली आहे. पुढेही पक्षाच्या विचारधारेविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

Akhilesh Yadav
Nitish Kumar - बिहार विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमारांचा 'मास्टरस्ट्रोक' ; 'हा' मोठा निर्णय घेतला!

याचबरोबर समाजवादी पार्टीने हे देखील स्पष्ट केले आहे की, उर्वरीत पाच आमदारांना पश्चातप करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. तर, पक्षाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत निवडणुकीपूर्वी पक्ष त्यांच्या समर्थकांमधील बंडखोर आमदारांबद्दलची परिस्थिती स्पष्ट करू इच्छित आहे. यामुळे तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. तर उर्वरीत आमदारांना एकप्रकारे माफी मिळाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com