Hit And Run Act : 'हिट अँड रन' भाजपासाठी 'अॅक्सिडेंट स्पाॅट'...

Truck Drivers Protest Against Modi Sarkar : लोकसभा निवडणुकीपूर्वीचं ट्रेलर..?
Hit & Run Act :
Hit & Run Act :Sarkarnama

सचिन देशपांडे -

Hit And Run Act : हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूकदारांनी तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे. सोमवारी वाहतूकदारांच्या संपाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. शिवाय, संपामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांचा समावेश असल्याने त्याचा मोठा फटका थेट सामान्य जनतेला बसला आहे. लोकसभा निवडणूकीचं पुर्वी हे ट्रेलर तर नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. भविष्यात दुध, भाजीपाला, अन्नधान्य यांच्या पुरवठ्यात बाधा निर्माण झाल्यास महागाईच्या झळांनी भाजपा पोळून निघेल. (Latest Marathi News)

Hit & Run Act :
Phaltan NCP News : निवडणुका आल्या की, त्यांना पुतळ्यांची आठवण; संजीवराजेंचा खासदार निंबाळकरांवर पलटवार

तीन दिवसांच्या संपाचा ट्रेलर सध्या सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा आणि त्यामुळे पुन्हा एकदा संप आणि देशातील महागाई वाढली तर, त्यात भाजपा थेट हिट अँड रन ची बळी ठरु शकते. हा केवळ एका राज्याचा विषय नसून हा संपुर्ण देशाचा विषय आहे. प्रत्येक राज्याला आणि प्रत्येकाला थेट कनेक्ट करणारा हा विषय आहे.

त्यामुळे या हिट अँड रन पासून बचावासाठी केंद्र सरकारने वेळीच ब्रेक दाबण्याची गरज आहे. नाही तर, अॅक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन दिवसांच्या या संपाने जनतेचे हाल समोर आले असताना लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान अशा प्रकारच्या संपाने अॅक्सिडेंट चा धोका अधिक आहे. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीत टँकर चालकांचा संप हा आगीत तेल ओतणारा ठरु शकतो. हे टाळण्यासाठी कुठलाच ठोस प्रयत्न झाला नसल्याची चर्चा रंगली आहे.

Hit & Run Act :
Hit & Run : विदर्भातील 322 पेट्रोल पम्पांवर मंगळवारी दुपारनंतर मोठे इंधन संकट...

इंधनाचा पुरवठा करणारे टँकर जिल्ह्याजिल्ह्यात पोहचले नाही तर स्थानिक पातळीवर सर्वच गोष्टींना रेड सिग्नल द्यावा लागेल. शाळेच्या बसेस थांबतील, शहरातील वाहतुक थांबेल, भाजीपाला, दुध यांचे वितरण थांबले की आपसूकच महागाई वाढेल. महागाई थांबविण्याची कुठलीही यंत्रणा जिल्हास्तरावर उभी केल्या गेली नाही. वाहतुक ठप्प झाली की आपोआप साठेबाज डोेकेवर काढणार त्या पाठोपाठ महागाईचे तीव्र चटके सर्वसामान्यांना बसल्याशिवाय राहणार नाहीत.

रेल्वेने मालाची ने आण करणे हे काही जिल्ह्यात शक्य आहे. पण, जिथे शक्य नाही तिथे महागाईच्या झळा तीव्र होतील. त्यात राज्य व केंद्र सरकारकडे स्वतःची कुठलिही मोठी वाहतुक यंत्रणा नाही. त्यामुळे खाजगी वाहतुकदारांवरच डिपेंड रहावे लागते. ट्रक चालक आणि मालक यांचे खुप मोठे नेटवर्क असून त्याच्या एखाद्या निर्णयाने महागाईचे चाक जोरात फिरले तर त्या महागाईला ब्रेक लावणे कठिण आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hit & Run Act :
Bjp Vs Shiv sena : नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाचा? भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

खरीप हंगामातील खाद्यान्न व डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात आधीच काही लाख मेट्रिक टनाची घट असताना महागाई आपसूकच वाढली आहे. त्यात टँकर, ट्रक चालकांचे संप महागाईचा भडका उडवू शकतात. कांद्याच्या किंमतीवरुन सरकार पडतात. तर महागाई च्या अॅक्सिडेंट चा बचाव सरकार म्हणून भाजपाला प्राधान्याने करावा लागेल. त्याच बरोबर ट्रक चालक - मालक यांच्या हिट अँड रन प्रकरणातील कायद्यातील नवीन तरतुदींना आडमुठ्या स्वभावाने कायम ठेवणे हे पाॅलिटिकल अॅक्सिडेंट करण्यासारखे ठरणार आहे. त्यामुळे हिट अँड रन प्रकरणी कायद्यातील नवी तरतुदींना ब्रेक लावणे हाच काय तो राजकीय क्लच भाजपाला सोडवा लागेल. तरच मोदी सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या गाड्या धावतील.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com