Phaltan NCP News : निवडणुका आल्या की, त्यांना पुतळ्यांची आठवण; संजीवराजेंचा खासदार निंबाळकरांवर पलटवार

Sanjivraje Naik Nimbalkar खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेल्या आरोपाला संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिउत्तर दिले.
Sanjivraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Sanjivraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Phaltan NCP News : निवडणुका जवळ आल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी काहींना प्रेम उफाळुन आले आहे. फलटण शहरात त्यांच्या पुतळ्यांची उभारणी करण्याची आवई उठवून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न फलटणकर खपवून घेणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

खासदार रणजितसिंह निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी केलेल्या आरोपाला संजीवराजे निंबाळकर Sanjivraje Naik Nimbalkar यांनी प्रतिउत्तर दिले. संजीवराजे म्हणाले, फलटण शहरात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारुन त्यांचे विचार, त्यांनी घालून दिलेले आदर्श समाजासमोर विशेषतः तरुणांसमोर ठेवण्यासाठी आम्ही आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहोत.

त्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून या सर्व महापुरुषांचे पूर्णाकृती व अर्धाकृती पुतळे उभारण्याबाबत नगर परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून नगर परिषदेत त्याबाबत रीतसर ठराव झाले आहेत. सदर सर्व पुतळ्यांच्या ठिकाणी व परिसर सुशोभीकरणाचे ठराव नगर परिषदेने मंजूर केल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

केवळ सदर ठराव मंजूर करुन आम्ही गप्प बसलो नाही तर महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी शासकीय निधी उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी, नियम, निकष यांची माहिती असल्याने या महापुरुषांच्या स्मारकांसाठी गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या माध्यमातून या महापुरुषांचे पुतळे तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून परिसर सुशोभीकरण कामे काही ठिकाणी सुरु आहेत. काही पूर्णत्वास गेली आहेत, काहींची टेंडर्स निघाली असल्याचे संजीवराजे यांनी निदर्शनास आणून दिले.

Sanjivraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Satara NCP News : जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर वळसे-पाटलांनी बोलणं टाळलं...

आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महापुरुषांचे पुतळे व परिसर सुशोभीकरण प्रक्रिया सुमारे ६/७ वर्षांपासून सुरु आहे. १६ मे २०१६ रोजी फलटण नगर परिषद सर्वसाधारण सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा उभारणे, तसेच शहरातील म.गांधी यांचा सध्या असलेला पुतळा जुना व जीर्ण झाल्याने तो बदलणेस आणि महात्मा फुले यांचा पुतळा समितीच्या मागणी नुसार सध्याच्या पुतळ्याच्या जागी नवीन पूर्णाकृती पुतळा उभारणीस मान्यता देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

Sanjivraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Mumbai BMC Alliance : शिंदेंची शिवसेना अन् मनसे या नवीन युतीची राज्यात पहाट होणार?

फलटण नगर परिषद तत्कालीन मुख्याधिकारी यांनी ३० एप्रिल २०२१ च्या पत्रानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा फुले उत्सव समिती सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वरील दोन्ही महामानवांचे शहरात असलेले पुतळ्यांचे जागी पूर्णाकृती पुतळे उभारणे व परिसर सुशोभीकरण करण्याची केलेल्या मागणीस नगर परिषद सर्वसाधारण सभा २३ एप्रिल २०२१ च्या सभेत मान्यता देण्यात आल्याचे कळविले आहे.

Sanjivraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan BJP News : तीस वर्षे सत्तास्थाने तुमच्याकडे; कामे करण्यास कोणी रोखले होते : रणजितसिंह निंबाळकरांचा टोला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य म. फुले यांचे शहरातील अर्ध पुतळ्यांच्या जागी पूर्णाकृती पुतळे उभारणे कामी पुतळा समिती अध्यक्ष आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या मागणीनुसार दि. २६ एप्रिल २०२१ च्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली असून सदर दोन्ही पुतळे समितीने तयार करुन घेऊन उभारणीस परवानगी मागितल्याचे या ठरावात नमूद आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

Sanjivraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Bjp Shinde Alliance : भाजप खासदाराने शिंदेंच्या मंत्र्याची स्तुती का केली? चर्चांना उधाण

एकूणच शहरातील महापुरुषांचे पुतळे पूर्णाकृती करणे, परिसर सुशोभित करणे व त्या परिसरातील रस्ते, बाजूचे वीज खांब डेकोरेटिव्ह उभारणे ही प्रक्रिया सुरु आहे. त्यास नगर परिषद आवश्यक मान्यता आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेण्याची प्रक्रिया आणि सदर कामे प्रत्यक्ष सुरु आहे. केवळ श्रेय घेण्यासाठी स्थानिक विकास निधीतून निधीच्या तरतुदींचे पत्र देवून आपण हे पुतळे उभारणी करीत असल्याचे दाखविणे अयोग्य व या शहराच्या सर्वांगीण विकासात सर्वांनी एकजुटीने कार्यरत राहण्याच्या परंपरांना खंडित करणारे असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

Sanjivraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Nimbalkar : रामराजेंनी घेतली विजयसिंह मोहिते पाटलांची भेट; नेमकं काय कारण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com