नाना पटोले यांनी ती `चूक` केली नसती तर आज शिंदे-फडणवीस यांचे धाडस झाले नसते...

नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त राहिले
Nana Patole
Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची कोंडी करण्यासाठी शिवसेनेच्या (Shiv sena) उमेदवारालाच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवल्याने उद्या होणार्या विधिमंडळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Maharashtra Assembly) रंगत वाढली आहे.

नाना पटोले (Nana Patole) य़ांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घ्यावी लागत आहे. काॅंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष व्हायचे म्हणून नानांनी या पदाचा दीड वर्षांपूर्वी राजीनामा दिला. नानांनी राजीनामा देऊ नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही होते. तरी काॅंग्रेसने विधानसभेचे अध्यक्षपद रिकामे केले. सरकारला धोका असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक वेळेत होऊ शकली. जेव्हा निवडणूक घ्यायचा निर्णय सरकारने घेतला त्याला राज्यपालांनी मंजूर दिली नाही. त्यामुळे सारा कारभार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाहावा लागला. त्यातून अनेक कायदेशीर कटकटी निर्माण झाल्या.

Nana Patole
सुहास कांदेंना बंडखोरीचे गिफ्ट; एकनाथ शिंदेंनी रोखले छगन भुजबळांच्या ६०० कोटींना ब्रेक!

बंड केलेल्या शिवसेना आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार विधानसभेच्या उपाध्यक्षांना आहे का, असा मुद्दा बंडखोरांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला. तसेच उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची खेळी केली. त्यामुळे हा वाद आणखी किचकट झाला. नाना पटोले हे अध्यक्ष असते तर त्यांनी आणखी कठोर भूमिक घेत बंडखोरांना वेळीच चाप लावला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. अध्यक्षपद रिकामे असल्याचा फायदा भाजपला घेता आल्याचे बोलण्यात येत आहे. त्यामुळेच हे सरकार जाण्यात अध्यक्षपद रिक्त ठेवण्याची चूक महाविकास आघाडीला भोवल्याचे बोलण्यात येत आहे.

Nana Patole
आमदार तर गेलेच पण उद्धव ठाकरे यांची `सावली`ही गायब!

आता नव्याने निवडणूक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी तातडीने बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात उद्या ३ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरली असून शिवसेनेचे आमदार राजन साळवी हे महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. राजन साळवी यांना निवडून देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षांकडून आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.

Nana Patole
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधीमंडळाच्या कामकाजापासून रोखा!

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीत ज्या पक्षाचा अध्यक्ष तो पक्ष बहुमतात असल्याचे ग्राह्य धरले जाते. भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाची उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. राजन साळवी यांचा अर्ज दाखल झाल्याने आता विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे राजन साळवी विरोधात भाजपचे राहुल नार्वेकर अशी लढत होणार आहे.

तर आमदार अपात्र ठरतील

विधानसभेत पक्षादेश (व्हीप) सर्व आमदारांना बंधनकारक असते. शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांनी राजन साळवी यांना मतदान करावे हा पक्षादेश आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनाही त्यांचा पक्षादेश लागू आहे. त्यामुळे पक्षादेशाविरोधात जर मतदान करण्यात आले तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होऊन ते आमदार अपात्र ठरतील.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होऊ - राजन साळवी

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि मित्र पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुुळे अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत मी निवडून येईन व महाविकास आघाडीचाच अध्यक्षी होईल हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com