Bead Politics : बीड जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत वाद वाढला ? हेवेदावे करण्यातच पदाधिकारी व्यस्त

Shivsena : बीडमध्ये शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण ?
Shivsena
Shivsena Sarkarnama

Beed News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सध्या वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. राज्यभरात दौरे, मेळावे, सभा घेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राजकीय नेते प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे बीड जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेत एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यातच पदाधिकारी पुढे असल्याने पक्षांतर्गत वाद वाढण्याची शक्यता आहे.

वर्षभरापूवी राज्यात सत्तांतर झाले असले तरी पूर्वीही शिवसेना सत्तेत होती. शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तर सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचेच (शिंदे गट) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचेच काही पदाधिकारी आताच्या शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. मात्र, पक्षाचे संघटन वाढण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोड्या, पक्षांतर्गत हेवेदावे करण्यातच पदाधिकारी व्यस्त असल्याचे चित्र आहे.

Shivsena
Walse Patil standfirm on his Statement: ‘ती’ दिलगिरी गैरसमजाबद्दल; पवारांबाबतच्या विधानावर वळसे पाटील ठाम, अजितदादा गट पाठीशी

पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीतील कार्यक्रमातूनही या कुरघोड्या लपल्या नाहीत. बीड जिल्ह्यात पुर्वीच्या युतीच्या सुत्रानुसार एकमेव बीड मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याचा असल्याने मुख्यमंत्र्यांकडून 'सढळ' हाताने वाढप्याची भूमिका निभावली जात आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही मुख्यमंत्र्यांचा शेरा असलेली 'कोट्यावधींची उड्डाणे' करणारी पत्रे दाखविली जात आहेत. मात्र, यातून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी किती मजबूत होते, हा मात्र, संशोधनाचा विषय आहे.

पंधरवड्यापूर्वी शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांचे कपडे काढताना पक्षाची लक्तरे वेशीला टांगली. कोणत्यातरी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचा बॅनरवर फोटो छापून त्यावर गुटखा, सावकारकी असे गंभीर आरोप करणारा मजकूर लिहीत त्या बॅनरवर चपला मारो आंदोलन केले. पण या आरोपामध्ये काय, खरे व काय खोटे हा वेगळा विषय असला तरी या आंदोलनामागे माजी जिल्हा प्रमुख ॲड.चंद्रकांत नवले यांचा हात असल्याचा आरोप कुंडलिक खांडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी केला.

ॲड.नवले यांना बांडगुळ अशी उपमा देत त्यांच्या हाकालपट्टीची मागणीही केली. यावर आपला संबंध नसल्याचे ॲड.नवले यांनी सांगीतले. याच काळात जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव (ता.अंबाजोगाई) येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार रुग्णालयातील बाह्यस्त्रोत भरती घोटाळा गाजला. याचाही संबंध शिवसेना पदाधिकाऱ्याशीच असल्याची चर्चा होती. त्यामुळे पक्षाची जिल्ह्यात पुरती बेअब्रू झाली.

Shivsena
Ghodganga Sakhar Karkhana : चर्चेला तयार पण मागण्यांवर ठाम; आंदोलनाच्या ५१ व्या दिवशीही कामगारांची भूमिका कायम

पूर्वीची शिवसेना आणि आता दोन शिवसेना झाल्या असल्या तरी, नको त्या 'धंद्यांत' या पदाधिकाऱ्यांची नावे येत असल्याने पक्षाची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत. मात्र, तरीही पक्षाकडून अशा मंडळींची पाठराखण आणि त्यांच्या व्यवसायांना पाठबळच मिळत आहे.

पक्षनिरीक्षक राजेश कदम जिल्ह्यात आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पुढाकाराने आढावा बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री सुरेश नवले व दुसरे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांचीही उपस्थिती होती.

पण बैठकीचे फोटो माध्यम व समाज माध्यमांना पोचविताना सुरेश नवले व सचिन मुळूक यांचे फोटो येणार नाहीत, याची दक्षता घेतली गेली. तर दुसरीकडे सचिन मुळूक यांच्या पुढाकाराने झालेल्या दुसऱ्या बैठकीनंतरही हाच कित्ता गिरविला गेला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com