MahaVikas Aghadi News : इंडिया अन्‌ महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर? काँग्रेसनेच पेरली बीजे

Congress : काँग्रेसने देशभरात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वयकांची नेमणूक करीत इंडिया आघाडीतील इतर मोठ्या राजकीय पक्षांना कोंडीत पकडले.
Soniya Gandhi-uddhav Thackeray-Sharad Pawar
Soniya Gandhi-uddhav Thackeray-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

सचिन देशपांडे

Mumbai News : काँग्रेस पक्षाने देशभरात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वयकांची नेमणूक करीत इंडिया आघाडीतील इतर मोठ्या राजकीय पक्षांना कोंडीत पकडले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीलाही गृहित धरल्याचे चित्र आहे. काँग्रेसची ही भूमिका इंडिया आघाडीबरोबर राज्यातील महाविकास आघाडी या दोन्ही घटकांना फुटीच्या उंबरठ्यावर नेणारी आहे. (India, MahaVikas Aghadi on the verge of breaking up?)

काँग्रेसने सर्वच लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमत आपली रणनीती उघड केली आहे. इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा न करता थेट काँग्रेसने समन्वयकांची नेमणूक करीत त्या त्या लोकसभा मतदारसंघावर एकतर्फी दावा केला आहे. हा दावा करताना त्यांनी राज्यस्तरावरील राजकीय पक्षांना गृहित धरल्याचे चित्र असून अशा प्रकारे काँग्रेसची एकतर्फी घोडदौड राहिली तर इंडिया आघाडी काय, तर राज्यातील महाविकास आघाडीदेखील काँग्रेससोबत जास्त काळ एकत्र संसार करू शकणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Soniya Gandhi-uddhav Thackeray-Sharad Pawar
Jayant Patil News : ‘ए...जयंत कळत नाही का?’ : जयंतरावांनी सांगितला पतंगराव कदमांचा किस्सा

राज्यात कोणतीही आघाडी होण्याची सूतराम शक्यता नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक पक्ष स्वबळावर आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्याविरोधातील उमेदवार शोधणे, त्यांना उभे करणे यासाठीची घोडदौड राजकीय पक्षांची सुरू आहे. त्यामुळे काही मतदारसंघांत चौरंगी, तर काही मतदारसंघांत बहुरंगी लढत होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांद्वारे स्थानिक पातळीवर समन्वयक, निरीक्षक नेमणे सुरू केले आहे. त्याचबरोबर संभाव्य उमेदवारांना तयारी लागा, असा संदेश दिला गेला आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसने ४८ ठिकाणी लोकसभा मतदारसंघात समन्वयकांची नेमणूक केली. याचा दुसरा असा अर्थ होतो, की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या जागांसाठी ते काँग्रेसचे नेते समन्वयक असतील काय? हे समन्वयक दोन्ही पक्षांना चालतील काय? शिवसेनेने मागितलेल्या २३ जागांवर काँग्रेसने पाणी फेरल्याचे चित्र तूर्तास आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीसाठी किती जागा सोडेल, हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील किती जागांवर राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट काँग्रेसकडून किती जागा घेतील, असा प्रश्न कायम आहे.

Soniya Gandhi-uddhav Thackeray-Sharad Pawar
Nashik Loksabha : लोकसभा इच्छुकांचे मराठा आरक्षण अन्‌ अध्यक्षांच्या निर्णयाकडे डोळे

काँग्रेसने थेट ४८ जागांवर लोकसभा समन्वयकांची नेमणूक करीत आपला अजेंडा पुढे रेटला आहे. काँग्रेसचा हा अजेंडा फुटीचे कारण ठरू शकतो. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीबरोबर देशाच्या इंडिया आघाडीत फुटीचे बीजे काँग्रेसने रोवल्याचे दिसून येत आहे. मुळात काँग्रेसला सर्वच राजकीय पक्षांना एकत्र घेत निवडणूक लढविण्यात स्वारस्य नसल्याची चर्चा आहे. काँग्रेसला स्वतःच २०२४ ची निवडणूक स्वबळावर लढण्याची खुमखुमी आहे काय, अशी चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत मतविभाजनाचा फटका कोणाला बसेल, यासाठी राजकीय विश्लेषकांची गरज भासणार नाही.

Edited By : Vijay Dudhale

R...

Soniya Gandhi-uddhav Thackeray-Sharad Pawar
Kolhapur Lok Sabha : एकाच उमेदवारासाठी तीन पक्षांचे दावे, 'सरप्राईज'मध्ये लपलं गूढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com