Karnataka Election : भाजप-काँग्रेसमध्ये बंडखोरीला ऊत : बोम्मई, येडियुराप्पा अन॒ खर्गे, शिवकुमार लागले कामाला

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, निवडणूक अधिकारी धर्मेंद्र प्रधान, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी बंडखोरांशी बोलणी करून त्यांची मनधरणी केली.
Congress and BJP
Congress and BJP File Photo

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून भाजप आणि काँग्रेसमधील बंडखोरी अद्याप शमलेली नाही. भाजप (BJP) आणि काँग्रेसची (Congress) तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी तीव्र झाली आहे. (Insurgency in BJP, Congress in Karnataka)

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयात बंडखोरांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले असले तरी दोन्ही पक्षातील बंडखोरी अद्याप शमलेली नाही.

Congress and BJP
BJP NEWS : चित्रा वाघांसमोरच रंगला भाजप कार्यकर्त्यांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; खासदार अन्‌ इच्छूक उमेदवाराला कोसळले रडू

भाजपने सोमवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करताच तिकीट हुकलेल्या उमेदवारांनी बंडाचा झेंडा फडकावला. कोप्पळ, म्हैसूरमधील कृष्णराज, चित्तापूर, हगरी बोम्मनहळ्ळी या ठिकाणी बंडखोरी दिसून आली. भाजपचे तिकीट मुकलेल्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. हगरी बोमनहळ्ळीत माजी आमदार नेमीराज नायक यांनी आज समर्थकांची बैठक घेतली. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील किंवा धजदमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. कोप्पळमध्येही भाजपचे तिकीट गमावलेले सी.व्ही. चंद्रशेखर यांनी बंड केले आहे. येथील खासदार संगण्णा करडी यांच्या सुनेला भाजपने उमेदवारी दिली आहे. म्हैसूरच्या कृष्णराज मतदारसंघातून तिकीट न मिळालेले विद्यमान आमदार रामदासही नाराज आहेत.

बंडखोरी शमवण्यासाठी भाजप नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, निवडणूक अधिकारी धर्मेंद्र प्रधान, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांची मनधरणी केली.

Congress and BJP
Atique Ahmed News : अतिकच्या खुनापूर्वी त्याच्या पत्नीने सीएम योगींना लिहिलेले पत्र आले पुढे : 'तुम्ही हस्तक्षेप न केल्यास माझी मुलं, पती, दीराचा...'

काँग्रेसमध्येही बंडखोरी

काँग्रेस पक्षात बंडखोरी अजूनही जोरात आहे, बंगळुर, म्हैसूर, शिमोगा, दावणगेरे, बागलकोट जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात बंडखोरी दिसून आली आहे. बंगळूरच्या पुलिकेशीनगरमधून तिकीट गमावलेल्या अखंड श्रीनिवासमूर्ती यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत एम. पी. प्रकाश यांच्या कन्या हरपनहळ्ळीत इच्छुक होत्या. प्रकाश यांच्या कन्या लता, वीणा यांनी काँग्रेसचे उमेदवार कोटरेश यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिमोगा शहर मतदारसंघातील माजी आमदार के. बी. प्रसन्नकुमार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. माजी आमदार अनिल लाड यांनी बळ्ळारी शहरात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत.

Congress and BJP
Operation Lotus in Maharashtra : महाराष्ट्रात भाजप खासदारांची संख्या घटणार : तावडे समितीच्या अहवालानंतर राज्यात ‘ऑपरेशन लोटस’

काँग्रेस नेत्यांकडून मनधरणी

केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी बंडखोर उमेदवारांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com