भास्करराव-अशोकरावांची जोडी ठरली हिट!

खतगावकर यांच्या भाजप प्रवेशाची चव्हाणांना चांगलीच किंमत मोजावी लागली होती.
Ashok Chavan, Bhaskarrao Khatgaonkar
Ashok Chavan, Bhaskarrao Khatgaonkarsarkarnama
Published on
Updated on

नांदेड : संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या देगलूर-बिलोली (Deglur-Biloli) विधानसभा निवडणुकीत काँग्रेससचे जितेश अंतापूरकर हे तब्बल ४२ हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. बांधकाम मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे मेहुणे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Khatgaonkar) यांची खेळीच देगलूरचा आमदार ठरवणार, असल्याची चर्चा या पोटनिवडणुकीत रंगली होती. आजच्या निकालानंतर ते स्पष्टच झाले. जितेश अंतापूरकर यांना १ लाख ८ हजार ७८९ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुभाष साबने यांना ६६ हजार ८७२ एवढी मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीला गेल्या निवडणुकीतील मतांपेक्षा कमी मते मिळाली असून डॅा. उत्तम इंगोले यांना ११, ३४७ मतांवर समाधान मानावे लागले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांच्याशी मतभेद झाल्यामुळे खतगावकर भाजपमध्ये गेले होते. खतगावकर यांच्या भाजप प्रवेशाची चव्हाणांना चांगलीच किंमत मोजावी लागली होती. त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. देगलूर-बिलोलीच्या पोटनिवडणुकीतही भाजपने डाव टाकत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. साबणे आणि खतगावकरांच्या ताकदीवर चव्हाण यांना शह देण्याच प्रयत्न भाजपने सुरु केला होता. मात्र, चव्हाण यांनी वेळीच ही खेळी ओळखली आणि लोकसभेचा धक्का परत नको म्हणत खतगावकर यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये घेतले.

Ashok Chavan, Bhaskarrao Khatgaonkar
देगलूरमध्ये पराभवानंतरही चंद्रकांतदादा म्हणतात `आता आता मध्यावधी निवडणूक घ्याच!`

खतगावकर यांच्या घरवापसीमुळे भाजपला मोठा धक्का बसला. बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघाचे खतगावकर यांनी नेतृत्व केले आहे. खतगावकर हे ज्या उमेदवाराच्या पाठीमागे आपली ताकत उभी करतात तोच उमेदवार निवडून येतो. आजच्या निकालाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. खतगावकरांचा दांडगा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची मोठी फळी या मतदारसंघात असल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळे जितेश अंतापूरकर यांनी तब्बल ४१ हजार ९३३ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. पंढरपूर पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती करण्याची भाषा करणाऱ्या भाजपला देगलूर-बिलोलीच्या मतदारांनी नाकारले आहे.

Ashok Chavan, Bhaskarrao Khatgaonkar
वंचितची जादू ओसरली; आदर्शची फाईल काढण्याची धमकी मतदरांनी झिडकारली

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खतगावकर यांच्या राजेंद्रनगर नांदेड येथील निवासस्थानी भेट घेतली होती. फडणवीस व खतगावकर यांच्यात बंद खोलीत अर्धातास चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी खतगावकर यांची मनधरनी करण्याच प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची मनधरणी यशस्वी झाली नाही. खतगावकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि फडणवीसाचे पंढरपुरची पुनरावृत्ती देगलूर-बिलोलीमध्ये करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही खतगावकरांच्या काँग्रेस प्रवेशामुळे आम्हाला निवडणूक कठीण जाणार असल्याचे म्हटले होते. ते पाटील यांचे भाकित खरे ठरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com