देगलूरमध्ये पराभवानंतरही चंद्रकांतदादा म्हणतात `आता आता मध्यावधी निवडणूक घ्याच!`

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhhav Thackeray) यांचा राजीनामा मागितला आहे.
Uddhav Thackeray & Chandrakant Patil
Uddhav Thackeray & Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : आता असा कोणताही गुन्हा उरला नाही, ज्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर नाही. सरकारमधील एका मंत्र्याला भ्रष्टाचारामुळे अटक झाली. एका मंत्र्याच्या नातेवाईकांकडे बाराशे कोटींची मालमत्ता मिळाली. अमली पदार्थांबाबत एका मंत्र्याच्या नातेवाईकावर कारवाई झाली. तर, एका मंत्र्याच्या जावयाचे पंधराशे कोटीचे कंत्राट रद्द झाले आहे. आतातरी मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरून आपला राजीनामा देत, मध्यावधी निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज (ता.2 ऩोव्हेंबर) पत्रकार परिषदेत केली आहे.

Uddhav Thackeray & Chandrakant Patil
दादरामार्गे शिवसेनेची दिल्लीकडे कूच, उद्धव ठाकरे पंतप्रधान होणारच!

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सर्व कायदेशीर पर्याय संपल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तपास यंत्रणांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांना मध्यरात्री अटक झाली. आता असा कोणताही गुन्हा उरला नाही, ज्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर नाही. असा घणाघात पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.

पाटील म्हणाले, राजकारणातील नैतिकता महाविकास आघाडी सरकारने धुळीस मिळवली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आहे. या सर्व गोष्टी पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिला पाहिजे व मध्यावधी निवडणुकीस सामोरे गेले पाहिजे. अशी मागणी पाटील त्यांनी केली आहे.

Uddhav Thackeray & Chandrakant Patil
भास्कर जाधवांच्या मागणीने शिवसेनेत बंडाची बिजे?

अजित पवार आयता पैसा सोडायला तयार नाहीत

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून राज्यातील जनता हैराण झाले आहेत. मात्र, दर कमी होण्यासाठी राज्याने आपले कर कमी केले तर पेट्रोल, डिझेल दर कमी होईल. पण अजित पवार इंधनाच्या करातून मिळणारा आयता पैसा सोडायला तयार नाहीत, असे म्हणत, पाटील यांनी पेट्रोल, डिझेल दराबद्दल राज्य सरकारलाच जबाबदार धरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com