Jalgaon News: जळगाव मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी दिल्यानंतर उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांचे भाजपातील सहकारी ठाकरे गटाची मशाल घेऊन रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची झाली. वाघ (Smita Wagh) यांच्या ‘मोदी गॅरंटी’ला आघाडीच्या करण पवार (Karan Pawar) यांनी शेतकऱ्यांचे स्थानिक प्रश्न घेऊन आव्हान दिले.
उन्मेश पाटील यांनी उमेदवारी न मिळाल्याने ते पक्षातून बाहेर पडले. त्यांनी आपले निकटवर्तीय करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देऊन भाजपला कडवे आवाहन दिले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार का? भाजप बालेकिल्ला राखणार की गमावणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
भाजप विरूद्ध भाजपतूनच बाहेर पडलेला उमेदवार समोर असल्याने जळगावची निवडणूक मागील निवडणुकी इतकी भाजपला सोपी जाणार नाही, हे स्पष्टच आहे. निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवार असले तरी खरी लढाई या महाआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारातच आहे.
विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे पक्षाचे प्रगती पुस्तक चांगले नसल्याचे भाजपने केलेल्या पाहणीत आढळले आहे, तर आपल्याविरोधात पक्षाअंतर्गत काहींनी चुकीची माहिती पक्षश्रेष्ठींना दिल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी केला आहे.
विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरूनही त्यांची उमेदवारी नाकारली होती. उन्मेश पाटलांना त्यावेळी तिकीट देण्यात आले. यंदा उन्मेश पाटलांचे पक्षाने तिकीट कापल्याने त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पाटलांनी आपल्यासोबत पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवून दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जळगाव लोकसभेमध्ये सहापैकी सहा आमदार महायुतीचेच आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे जळगावचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी ऐनवेळी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी भाजप उमेदवाराला पाठींबा दिला आहे. या सर्व राजकीय घडामोडींवर जळगावकर कुण्याला कौल देणार हे चार जूनला कळेल.
जळगाव शहर ५४.४० ४९.५०
जळगाव ग्रामीण ६१.८१ ५५.७९
अमळनेर ५७.४८ ४७.४०
एरंडोल ६०.१८ ५५.८४
चाळीसगाव ५६.७९ ५०.३७
पाचोरा ५९.०१ ५३.९०
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.