काँग्रेसचा माफीनामा; पंतप्रधान मोदींबद्दलचे 'ते' शब्द घेतले मागे...

पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'अंगूठा छाप मोदी' असा करण्यात आला होता.
BJP, Congress
BJP, CongressFile Photo
Published on
Updated on

बेंगलुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शिक्षणावरून काँग्रेसकडून नेहमीच निशाणा साधला जातो. पण कर्नाटक काँग्रेसच्या (Karnataka Congress) अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'अंगूठा छाप मोदी' (angootha-chhaap) असा करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसविरोधात सोशल मीडियात वादळ उठलं. भाजप नेत्यांकडून काँग्रेसवर टीकेचा भडिमार करण्यात आला. त्यानंतर जाग आलेल्या काँग्रेसनं हे ट्विट काढून टाकत मोदींची माफी मागितली आहे.

कर्नाटकमधील दोन विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला आहे. याचदरम्यान सोमवारी कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदींविषयी वादग्रस्त ट्विट करण्यात आलं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

BJP, Congress
केंद्रीय मंत्र्याच्या मुलानंतर आणखी एका भाजप नेत्यासह चार जणांना बेड्या

'काँग्रेसनं शाळा उभारल्या. पण मोदी शिकले नाहीत. ज्येष्ठांसाठी शिक्षणाची योजना आणली, तरीही ते शिकले नाहीत. भीक मागण्यावर बंदी आहे. पण लोकांना भीख मागून आयुष्य जगणासाठी मजबूर करत आहेत. देशाचे हे हाल आहेत, कारण अंगूठा छाप मोदी', असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटनंतर भाजप कर्नाटकने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 'काँग्रेसच एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकते,' अशी टीका प्रवक्ता मालविका अविनाश यांनी केली.

कर्नाटक काँग्रेसच्या प्रवक्त्या लावण्या बल्लाळ यांनीही ट्विटरमधील भाषा दुर्दैवी असल्याचे म्हटलं. पण त्यांनी ट्विट मागे घेण्याचे किंवा माफी मागण्याचे कारण नाही, असं समर्थनही त्यांनी केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी रात्री उशिरा हे ट्विट मागे घेत असल्याचे जाहीर करून माफीही मागितली.

'राजकीय जीवनात नेहमीत संसदीय भाषेचा वापर व्हायला हवा, असं मी मानतो. कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका नवीन सोशल मीडिया मॅनेजरने केलेले असभ्य ट्विट खेदजनक आहे. हे ट्विट हटवण्यात आलं आहे,' अशी माहिती शिवकुमार यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com