
Sanjay Roy sentenced to life imprisonment : कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी सियालदह कोर्टाने मुख्य आरोपी संजय रॉय यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या केसमध्ये शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरबन दास यांनी म्हटले की, हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ श्रेणीत येत नाही. त्यामुळे गुन्हेगारास मृत्युदंडाची शिक्षा दिली जाऊ शकत नाही आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात संताप दिसत होता आणि प्रदीर्घकाळ विरोध प्रदर्शनही झालं होतं.
कोर्टात सीबीआयच्या(CBI) वकीलाने म्हटले की, हे एक असं प्रकरण आहे जे दुर्मिळातील दुर्मिळ श्रेणीत येते. समाजातील लोकांचा विश्वास कायम रहावा यासाठी संजय रॉयला जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे. यावर संजय रॉयच्या वकिलाने युक्तिवाद केला की, सरकारी वकिलांनी असे पुरावे सादर केले पाहिजे की, गुन्हेगाराच्या सुधारण्याची कोणतही शक्यता नाही. आम्ही फाशी शिवाय कोणतीही शिक्षा दिली जावी, यासाठी प्रार्थना करतो.
आरोपी संजय रॉयने(Sanjay Roy) महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर रुग्णालयातीलच सेमिनार हॉलमध्ये बलात्कारासारखे जघन्य कृत्य केले होते आणि तिची हत्या केली होती. या केसमध्ये संजय रॉयला कलम 64, 66 आणि 103(1) अंतर्गत गुन्हेगार ठरवलं होतं. संजय रॉयविरोधात जी कलमं लावण्यात आली आहेत, त्या कलमानुसार गुन्हेगारास जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपसारख्या शिक्षेची तरतूद आहे. आता जाणून घेऊयात ही केस रेयरेस्ट ऑफ रेयर श्रेणीत का नाही समाविष्ट केली गेली नाही.
कायद्यात रेयरेस्ट ऑफ रेयर शब्दाचा वापर त्या केससाठी केला जातो. जे इतके भयंकर आणि जघन्य असतात की, त्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. अशा प्रकरणात गुन्हेगाराच्या कृत्याची गंभीरता, पीडितेविरुद्धच्या गुन्ह्याचे भयानक स्वरूप आणि त्याचा समाजावर होणार परिणाम विचारात घेतला जातो. भारतीय दंड संहितेनुसार मृत्युदंड केवळ त्याच प्रकरणात दिला जातो, ज्यास न्यायालय रेयरेस्ट ऑफ रेयर मानते.
सरकार आणि न्यायपालिकेचे मत आहे की, मृत्युदंड केवळ अशाच गुन्ह्यांमध्ये दिला गेला पाहिजे, जो अत्यंत विकृत, सतत गुन्हेगाराचे चरित्र दाखवणारा आणि समाजासाठी अतिशय धोकादायक आहे. भारतासह अमेरिका, जपान, चीन (China)आणि अरब देशांशिवाय 52 देशांनी मृत्युदंडाची तरतूद कायम राखली आहे. तर 140 देशांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेला समाप्त केले आहे.
शिक्षेचा निकष निश्चत करणे शक्य नाही. म्हणून, न्यायाधीशांना शिक्षा ठरवण्याचे विवेकाधीन अधिकार देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालय विवेकाधिकार योग्यरित्या वापरला गेला आहे, की नाही हे पाहते. सर्व परिस्थिती आणि कृती पाहिल्यानंतरच न्यायालय आपला निर्णय देते. हा मनमानीपणे घेतलेला निर्णय नाही, हे बघितले जाते. सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) अनेकवेळा स्पष्ट केले आहे की दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणाचा तपास न्यायाधीश-केंद्रीत नसून तो समाजाच्या धारणेवर अवलंबून असतो आणि तो केवळ विशेष प्रकारच्या गुन्ह्यांमध्येच लागू केला जाऊ शकतो.
जेव्हा एखाद्या प्रकरणात रेयरेस्ट ऑफ रेयरचा मुद्दा येतो, तेव्हा न्यायालयाचे दायित्व हे असते की, त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने अभ्यास करावा आणि शिक्षा निश्चित करावी. कोलकाता आरजी कर प्रकरणात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येची केस देखील एक गंभीर प्रकरण होते. ज्यामध्ये आरोपी संजय रॉयने केवळ हत्याच केली नाही, तर महिलेवर अत्याचाराच्या सर्व सीमा पार ओलांडल्या. हा अपराधही अतिशय जघन्य होता परंतु सियालदह कोर्टाने यास रेयरेस्ट ऑफ द रेयर अंतर्गत ग्राह्य धरलं नाही.
न्यायालयाने म्हटले की, या गुन्ह्यात दोषी संजयच्या मानसिक आणि शारीरिक परिस्थितीच्या आधारावर त्याची शिक्षा निश्चित केली गेली. सोबतच हेही लक्षात घेतलं गेलं की, त्याच्याविरोधात कधी कोणत्याही गंभीर गुन्ह्याचा इतिहास आढळला नाही. संजयच्याविरोधात न्यायालयाचा दृष्टिकोन हाच होता की, त्याने केलेला गुन्हा एवढा भयावह नव्हता की जो रेयरेस्ट ऑफ रेयर श्रेणीत ग्राह्य धरला जाऊ शकले. याशिवाय, न्यायालयाने त्याचे वय आणि मानसिकस्थितीही लक्षात घेतली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.