Nashik Lok Sabha Election 2024 : उमेदवारीबाबत छगन भुजबळ निश्चिंत, समर्थकांचे आहेत 'हे' डावपेच!

Chhagan Bhujbal News : नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या उमेदवारीच्या घोषणेला जाणीवपूर्वक होतोय विलंब
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांनी अद्याप उमेदवारीची आशा सोडलेली नाही. मात्र, नाशिक मतदारसंघातून ( Nashik Lok Sabha Election 2024 ) छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांची उमेदवारी निश्चित आहे. राजकीय डावपेचांमुळे त्याची घोषणा फक्त लांबली आहे.

नाशिक मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण? याबाबत चर्चा रंगली आहे. त्यात रोज नव्या अंदाज आणि अफवांची भर पडते आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने अद्याप आशा सोडलेली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष या मतदारसंघाबाबत काय भूमिका घेते, याला महत्त्व आले आहे. त्यातच भाजपने हस्तक्षेप वाढवल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील राजकीय धोरणाचा भाग म्हणून थेट दिल्लीतून भाजपची सूत्रे हलली आहेत. त्याचा भाग म्हणून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना ओबीसी चेहरा म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी देताना भाजप तसेच स्वतः भुजबळ यांनीही काही अडाखे बांधले आहेत. त्यादृष्टीने निवडणुकीची तयारी करताना प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे ( Rajabhau Waje ) यांच्या बलस्थानांचा अभ्यास केला जात आहे. त्याचा एक भाग म्हणूनच मराठा समाजाचे काही उमेदवार उभे राहावे, असे प्रयत्न आहेत. निवडणुकीची चर्चा जेवढी लांबेल तेवढे इच्छुक आणि उमेदवारीचा दावा करणारी काही मंडळी सहकाऱ्यांच्या दबावातून अपक्ष उमेदवारी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनुकूल राजकीय वातावरण निर्माण होण्याची वाट पाहिली जात आहे. त्यामुळेच भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब केला जात असल्याचे बोलले जाते.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News: नाशिकमधून छगन भुजबळच का? हे आहे कारण...

नाशिक मतदारसंघातून भुजबळ यांची ही चौथी निवडणूक आहे. 2009 मध्ये पहिल्या निवडणुकीत दोन मराठा उमेदवारांत मत विभागणी झाली होती. त्यातून समीर भुजबळ हे विजयी झाले. नंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्या प्रमाणात विभागणी होऊ शकली नाही. त्यामुळे भुजबळ तसेच समीर भुजबळ हे दोघेही पराभूत झाले होते. यंदा मात्र विद्यमान खासदार यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांचे समर्थक खासदार गोडसे ( Hemant Godse ) यांच्यावर उमेदवारीसाठी दबाव आणतील, त्यातून त्यांनी अपक्ष उमेदवारी केल्यास त्याचा लाभ महायुतीच्या उमेदवाराला होईल, असा कयास आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब केला जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.

यंदा नाशिकमधून मंत्री भुजबळ यांना उमेदवारी देण्यामागे भारतीय जनता पक्षाचे धोरणात्मक आणि राजकीय डावपेच असल्याचे बोलले जाते. त्यातून महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाला आपली 'प्रो ओबीसी' ही प्रतिमा समाजात रुजविण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यामुळेच भुजबळ यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा राहील. केंद्रातील मोठा नेतादेखील नाशिकमध्ये येऊन प्रचाराची व निवडणुकीची घडी बसविण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. नाशिकची निवडणूक पाचव्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अद्याप जवळपास वीस दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीचा अनुकूल उपयोग भुजबळ आणि भारतीय जनता पक्ष करून घेतील. त्यामुळे उमेदवारी जाहीर होत नसली तरीही भाजपने आपली निवडणूक यंत्रणा सक्रिय करण्यावर भर दिला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

Chhagan Bhujbal
Hemant Godse News : महायुतीतून सीटिंग खासदाराचा पत्ता कट; गोडसे शरद पवार गटाच्या संपर्कात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com