BJP Political Analysis : उत्तर महाराष्ट्रातील वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा यंदा प्रखर संघर्ष

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या पाच मंत्र्यांची यंदाच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे.
Girish Mahajan, radhakrishna Vikhe Patil, Vijaykumar Gavit
Girish Mahajan, radhakrishna Vikhe Patil, Vijaykumar GavitSarkarnama

North Maharashtra News : उत्तर महाराष्ट्रात आठ लोकसभा मतदारसंघ आहेत. हे सर्वच्या सर्व महायुतीच्या ताब्यात आहेत. यातील सहा जागांवर यंदा भाजप (BJP Political Analysis) तर दोन जागांवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रखर झुंज द्यावी लागत आहे.

उत्तर महाराष्ट्रात डॉ. हिना गावित (नंदुरबार), डॉ सुभाष भामरे (धुळे), स्मिता वाघ (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), डॉ. भारती पवार (दिंडोरी), डॉ. सुजय विखे पाटील (नगर) आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे (नाशिक), सदाशिव लोखंडे (शिर्डी) या सर्व आठ जागांवर 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना (Shiv Sena) युतीने कब्जा केला होता. यातील सहा जागा भाजपने (BJP) एकहाती जिंकल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा त्यांनी धुव्वा उडविला होता. (Lok Sabha Election 2024 News)

Girish Mahajan, radhakrishna Vikhe Patil, Vijaykumar Gavit
Dhule Crime News : धुळ्यात खळबळ; भाजपच्या जिल्हाध्यक्षासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढत आहे. त्यांच्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट यांसह जवळपास 19 पक्ष आहेत. मात्र यातील अनेक पक्षांचे अस्तित्व उत्तर महाराष्ट्रात फारसे नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे नेते आहेत, मात्र कार्यकर्ते नाहीत. अशीच कमी अधिक स्थिती शिंदे गटाची देखील आहे. भारतीय जनता पक्ष अधिक संघटित आहे. त्यांनी निवडणुकीची पुरेशी आणि वेळेआधी तयारी देखील केलेली आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी भाजपचा बराचसा वेळ खर्ची पडला. (Latest Political News)

दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये भाजपने फूट पडल्यामुळे त्यांची शक्ती कमी झालेली आहे. याची त्या तिघांनाही जाणीव आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्ष अतिशय एकजुटीने भाजपचा मुकाबला करीत आहेत. विशेष म्हणजे मतदारांमध्ये या तिन्ही पक्षांविषयी सहानुभूती आहे. प्रत्यक्ष प्रचारात मैदानावर आणि सभा मेळाव्यातून वेळोवेळी ते दिसून आले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर खासदार उन्मेष पाटील (जळगाव) वगळता उर्वरित पाचही खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. जळगावमधून उन्मेष पाटील यांच्या ऐवजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या दोन विद्यमान मंत्र्यांच्या मुलांना उमेदवारी आहे. डॉ. भामरे आणि डॉ. पवार या केंद्रीय राज्यमंत्र्यांना उमेदवारी आहे. या सर्व मतदार संघाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांसाठी पाच मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खरे तर उमेदवार नव्हे तर हे पाच मंत्री निवडणूक लढवीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सगळ्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी अतिशय नियोजनपूर्वक प्रचार केला.

महाविकास आघाडीने दिलेले बहुतांश उमेदवार सर्वसामान्य घटकांतील आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांना तक्रारी किंवा अपेक्षा दिसून येत नाहीत. माजी आमदार राजाभाऊ वाजे (नाशिक), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), करण पवार (जळगाव) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने निलेश लंके (नगर), श्रीराम पवार (रावेर), भास्कर भगरे (दिंडोरी), हे तीन उमेदवार दिले आहे. डॉ शोभा बच्छाव (धुळे), गोवाल पाडवी (नंदुरबार) हे काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Girish Mahajan, radhakrishna Vikhe Patil, Vijaykumar Gavit
Hemant Godse News: भाजपने शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना वाऱ्यावर सोडले का?

कांदा कोणाला रडवणार?

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, नगर आणि जळगाव या मतदारसंघांमध्ये कांदा निर्यात बंदी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न तीव्र होता. त्याने भाजपच्या श्रीराम मंदिर, 370 कलम आणि हिंदुत्ववाद या भाजपच्या प्रचाराला झाकोळले. सबंध निवडणुकीत हाच प्रमुख प्रचाराचा मुद्दा होता. त्याने सत्ताधारी पक्षाची अडचण केली. मात्र भारतीय जनता पक्षाने या समस्येलाही उपाय सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले. निवडणुकीच्या मतदानावर हे प्रश्न किती प्रमाणात प्रभावी ठरतात हे पाहणे उत्सुकतेचा विषय आहे.

महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह विविध नेत्यांनी प्रचार सभा आणि रोड शो करून भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विरोधकांकडून देखील काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी नंदुरबारला सभा घेतली.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी सहभाग घेतल्या. शरद पवार यांनी पूर्ण उत्तर महाराष्ट्र पिंजून काढला. याशिवाय विविध नेते प्रचारात उतरले होते. एकंदरच प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील '45 प्लस' हे ध्येय गाठायचे असेल तर, उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठ जागा त्यांना आपल्याकडेच राखाव्या लागतील. तशी परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभेच्या या परीक्षेत ते घवघवीत यश मिळवतात, काठावर पास होतात की, काही जागा गमावतात याची उत्सुकता आहे.

Girish Mahajan, radhakrishna Vikhe Patil, Vijaykumar Gavit
Nashik Shivsena Politics: ठाकरे गटाच्या नेत्यांमागे पोलि‍सांचे शुक्लकाष्ठ, पुन्हा तडीपारीच्या नोटीस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com