Nashik Shivsena Politics: ठाकरे गटाच्या नेत्यांमागे पोलि‍सांचे शुक्लकाष्ठ, पुन्हा तडीपारीच्या नोटीस

Nashik Lok Sabha Election 2024 : आघाडी आज प्रचार संपला तेव्हाही कायम होती. मात्र या दरम्यान शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामधील राजकीय शह काटशहाचे राजकारण जोरात सुरू आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Shivsena UBT News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची सातत्याने राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतदानाच्या दोन दिवस आधी पोलि‍सांनी पक्षाच्या नेत्यांना तडीपारच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे घटाने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांविषयी संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. ही आघाडी आज प्रचार संपला तेव्हाही कायम होती. मात्र या दरम्यान शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामधील राजकीय शह काटशहाचे राजकारण जोरात सुरू आहे.

आज यासंदर्भात पोलिसांनी शिवसेनेच्या चार प्रमुख पदाधिकार्‍यांना तडीपारीच्या नोटीस बजावल्या आहेत. अन्य काही पदाधिकार्‍यांना देखील अशा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीचे मतदान होत असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत तातडीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Manoj Jarange Patil News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? कॅबिनेटमध्ये आठ उपमुख्यमंत्री, काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनाही तडीपारीचा आदेश बजावण्यात आला होता. या आदेशासंदर्भात कायदेशीर निकषांची कोणतीही पूर्तता नव्हती. मात्र राजकीय दबावापोटी प्रशासनाने ही नोटीस बजावल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena) नेत्यांनी केला होता. या संदर्भात पोलिस आयुक्तांकडे दाद मागण्यात आली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी बडगुजर यांना 18 मे पर्यंत आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली होती.

नाशिक मतदारसंघात (Nashik Constituency) शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उमेदवार परस्परां विरुद्ध आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये अतिशय चुरशीची लढत होत आहे. शिवसेनेचे दोन गट परस्परांविरुद्ध उभे ठाकल्याने त्यांच्यात सातत्याने एकमेकांना राजकीय शह देण्याचे काम होत आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आणि पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केलेल्या सूचक विधानानंतर बडगुजर यांना नोटीस बजावण्यात आली होती. आता मतदानाच्या दोन दिवस आधी ही कारवाई झाली. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Vs BJP : मतदानाच्या काही तास आधी ठाकरेंचं मुंबईत 'मास्टर कार्ड'; पूनम महाजनांवरून भाजप 'बॅकफूट'वर ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com