Shivsena Analysis: राज्यात ठाकरेंचा डंका..पण विश्वासू तीन साथीदारांना बसला दणका

Lok Sabha Election 2024 Results : शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने सुरुवातीच्या कलात चांगला लीड घेतला असताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार मात्र काहीसे बॅकफूटवर पडले होते.
Rajan Vichare, Chhandrakant Khaire, anant gite
Rajan Vichare, Chhandrakant Khaire, anant gite Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Lok Sabha Results : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स पाहता तीन पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने सुरुवातीच्या कलात चांगला लीड घेतला असताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार मात्र काहीसे बॅकफूटवर पडले होते.

ठाणे मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी शिंदे यांनी त्यांचे विश्वासू शिलेदार नरेश म्हस्के यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. दुसरीकडे ठाकरे गटांकडून विद्यमान खासदार राजन विचारे हॅट्ट्रिक करतील, असे वाटत होते. मात्र, सुरुवातीच्या कलात शिंदे गटाचे म्हस्केंनी मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर म्हस्के यांनी मोठी आघाडी घेतली होती.

रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना मैदानात उतरवले होते. या ठिकाणची लढत सुरुवातीपासून चुरशीची मानली जात होती. याठिकाणी सुरुवातीच्या कलात सुनील तटकरे यांनी मोठी लीड घेतल्याचे चित्र आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हाय प्रोफाइल लढत असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे (MVA) चंद्रकांत खैरे विजयी होणार असा अंदाज 'एक्झिट पोल'मध्ये वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून कलामध्ये आघाडी-पिछाडीचा खेळ सुरु होता.

त्यामध्ये कधी विद्यमान खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील आघाडीवर होते तर कधी महायुतीचे संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आघाडीवर होते. त्यानंतरच्या फेऱ्यात खैरे बॅकफूटवर आल्याचे पाहवयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com