Udayanraje Bhosale : उदयनराजेंचे मायक्रोप्लॅनिंग ठरले मोलाचे !

Satara Lok sabha election 2024 Result : भाजपचे नेते अतुल भोसले यांनी त्यांची स्वतंत्र यंत्रणा राबवून उदयनराजेंना मताधिक्यासाठी प्रयत्न केले.डॉ.सुरेश भोसले हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले होते.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama

Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघातील कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने नेहमीच काँग्रेस विचारसरणीला साथ केली आहे. त्यामुळेच 2014, 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून उदयनराजेंची उमेदवारी असताना त्यांना दिलेले मताधिक्य किंवा 2019 च्या पोटनिवडणुकीत भाजपमधून उमेदवारी असताना उदयनराजेंच्या मतांची झालेली पीच्छेहाट यावरून हे स्पष्ट होते.

पाच वर्षापूर्वी झालेल्या 2019 च्या पोटनिवडणुकीत स्थानिक उमेदवार असणारे श्रीनिवास पाटील यांना कऱ्हाड दक्षिणने 31 हजाराचे मताधिक्य दिले होते. त्यामुळे या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणमध्ये उदयनराजेंबाबत असणारे नकारात्मक वातावरण दूर करण्याचे आव्हान उदयनराजेंसमोर होते. यासाठी भाजपने मायक्रोप्लॅनिंगही तयार केले होते. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक लक्ष या मतदारसंघावर देण्यात आले. कऱ्हाड, मलकापूर, सैदापूर, मसूर, उंब्रज, पाल, उंडाळे, रेठरे बुद्रुक आदी गावांतील नेत्यांसह प्रमुखांशी त्यांनी वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. त्यातूनच उदयनराजेंबद्दल असणार नाराजी दूर होण्यास मदत झाल्याचे दिसते.

याबरोबरच भाजपचे (BJP) नेते अतुल भोसले यांनी त्यांची स्वतंत्र यंत्रणा राबवून उदयनराजेंना मताधिक्यासाठी प्रयत्न केले.डॉ.सुरेश भोसले हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले होते. कऱ्हाड शहरात माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, त्यांचे समर्थक सुमारे 17 माजी नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे रणजित पाटील यांनीही मोठी मेहनत घेतली त्याचा परिपाक म्हणूनच आमदार शिंदेंचे मताधिक्य रोखण्यात यश आले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शेवटच्या दोन दिवसांत घेतलेली मेहनत मोलाची ठरल्याचे बोलले जाते.

MP Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : जिंकले तरी उदयनराजेंची नाराजी; काय आहे कारण?

महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शिंदे यांच्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, उदयसिंह पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सुरवातीपासून मतदारसंघात बाजू लावून धरली. त्यामुळे महायुतीपेक्षा महाविकासचे पारडे जड दिसत होते. कऱ्हाड, मलकापूर, सैदापूर भागात काँग्रेसचे प्राबल्य असल्याने तेथेही आमदार शिंदेंना मोठे मताधिक्य मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैदापूर येथे झालेल्या सभेचा लोकांवर प्रभाव पडल्याचे दिसून येते. शहरी भाग असणाऱ्या कऱ्हाड, मलकापूर, सैदापूर भागांतून गेल्या वेळी राष्ट्रवादीला मिळालेल्या मताधिक्याचा विचार करता महाविकास आघाडीचे आमदार शिंदेंना अल्प मताधिक्य मिळाल्याचे दिसते.

(Edited by : Chaitanya Machale)

MP Udayanraje Bhosale
Udayanraje Win In Satara Loksabha : कॉलरची शान वाढली; साताऱ्यात बाजी पलटली, उदयनराजेंनी मैदान मारलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com