Lok Sabha Election Result News Update : रायगड मतदारसंघात अनंत गिते विजयी होणार हेच वातावरण निकालाच्या दिवसापर्यंत होते. शिवसेनेमधील फूटीमुळे सहानूभुती आणि मुस्लिम-दलित मतदारांची साथ यामुळे अनंत गिते सहज विजयी होतील, असे वाटत होते. मात्र, महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शेतकरी कामागिर पक्षाच्या अलिबाग आणि पेण मतदारसंघातच तटकरेंना 85 हजार 932 मतांनी आघाडीने तटकरेंचा विजय निश्चित केला.
पेणमधून भाजप नेत्यांचा सुनील तटकरेंना Sunil Tatkare विरोध होता. तटकरेंना पेणमध्ये मनोमिलन बैठका घ्याव्या लागल्या. राष्ट्रवादीचे पेणमध्ये वर्चस्व नसतानाही भाजपचे आमदार रविशेठ पाटील, नव्यानेच भाजपात दाखल झालेले धैर्यशील पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने 46 हजार 936 मतांचा लीड घेतले. शेकापच्या बालेकिल्ल्यात अनंत गितेंची पिछेहाट झाली.
तटकरेंचे होमग्राऊंड श्रीवर्धमध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण जास्त आहे. तसेच या भागात शिवसेनेची देखील पूर्वी ताकद होती. त्यामुळे शिवसैनिक गितेंच्या मागे उभे राहतील, अशी शक्यता होती. आणि झाले ही तसेच अलिबाग आणि पेण मतदारसंघातच तटकरेंना 85 हजार 932 लीड होते. मात्र श्रीवर्धन मतदारसंघात 29 हजार 872 मतांचेच मताधिक्य तटकरेंना मिळाले.
शेतकरी कामगार पक्ष ज्याला पाठींबा देतो तो पक्ष अलिबाग मुरबाड मतदारसंघात लीड घेतो. मात्र, अलिबाग-मुरुड मतदारसंघात सुनील तटकरेंना 38 हजार 996 चे लीड आहे. शेकाप जरी अनंत गितेंच्या बाजुने उभी राहिली असली तरी मतदारांनी मात्र मतपेटीत तटकरेंनाच पाठींबा दिल्याचे दिसते.
सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या विरोधात भरत गोगवले भूमिक घेत असतात. मात्र, महायुतीचा धर्म म्हणून त्यांनी तटकरेंना साथ दिली. त्यांच्या महाड मतदारसंघातून तटकरेंना अवघे 3 मतांचा 616 ली मिळाले. त्यामुळे गोगावले हे काठावर पास झाल्याचे दिसते.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघातील अनंत गितेंना तब्बल 27 हजार 595 चे लीड आहे. त्यामुळे येथे भास्कर जाधव यांची जादू चालल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात कुणबी फॅक्टर प्रभावीपणे काम करीत असल्याचे दाखवून दिले. कुणबी समाजाने गितेंना मोठ्याप्रमाणात मतदान केले.
दापोलीत गितेंना हात
दापोली मतदारसंघात कुणबी आणि मुस्लिम समाजाने गितेंना साथ दिली. या मतदार संघात सुनील तटकरेंपेक्षा 8 हजार 432 जास्त मतांचे लीड अनंत गिते यांना दिले. येथे तटकरेंना अपेक्षित साथ मिळाली नसल्याचे देखील दिसले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.