Loksabha Election 2024 : धुळे मतदारसंघात नवा ट्विस्ट; जागा काँग्रेसची उमेदवार शिवसेनेचा?

Dhule Loksabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत. भाजपची उमेदवारी अमरीशभाई पटेल की फॅक्टर ठरणार?
Amrish Patel, Dhule Loksabha Constituency
Amrish Patel, Dhule Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Dhule Political News :

धुळे मतदारसंघात भाजपकडे उमेदवारांची रीघ तर काँग्रेसकडे वानवा अशी स्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडून हा मतदारसंघ ठाकरे गटाला देण्याबाबत मतप्रवाह सुरू आहे. या संदर्भात येत्या दोन दिवसांत वेगवान राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रभावी उमेदवाराचा शोध सुरू आहे. सध्या धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे दोन उमेदवार इच्छुक आहेत. आमदार कुणाल पाटील हे प्रभावी ठरू शकतात. मात्र, त्यांनी उमेदवारीस नकार दिला आहे. आठवडाभर वरिष्ठांकडून उमेदवाराचा शोध सुरू होता. त्यातून फारसे काही हाती आले नाही. त्यामुळे अचानक हा मतदारसंघ ठाकरे गटाला देता येईल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Amrish Patel, Dhule Loksabha Constituency
Jalgaon Politics : ‘गिरीशभाऊ, तुम्ही दिल्लीला जा’; गुलाबरावांच्या कोटीला महाजनांचे उत्तर ‘का आमच्या जिवावर उठता?’

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याशी धुळ्यातील स्थानिक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. काँग्रेसकडे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार नसल्यामुळेच भाजपकडे अनेक इच्छुक तयार झाले आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्या उमेदवारीला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. धुळ्यातील या राजकीय स्थितीमुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये रोज अस्वस्थता वाढत आहे. उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने यातून पक्षापुढेही समस्या आहेत. त्यामुळे नव्या राजकीय पर्यायांचा विचार सुरू झाल्याचे कळते.

धुळे लोकसभा मतदारसंघातील (Dhule Loksabha Constituency) धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि मालेगाव बाह्य या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे प्राबल्य आहे. अन्य मतदारसंघात काँग्रेसची यंत्रणा आहे. त्याचा मेळ बसवून भाजपला आव्हान देण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे.

त्यादृष्टीने ठाकरे गटाचे धुळ्याचे जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद पाटील यांना उमेदवारीची विचारणा होऊ शकते. मालेगाव बाह्य मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांच्या गटातील बंडूकाका बच्छाव यांचाही पर्यायी उमेदवार म्हणून विचार होत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जवळ आल्यामुळे धुळ्याचा उमेदवार निश्चित करण्याचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीमध्ये जागा काँग्रेसची (Congress)आणि उमेदवार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा असे धोरण राबवले जाऊ शकते. याबाबत पुढील दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यातील स्थानिक नेते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार आहेत. यातून महाविकास आघाडीची मतदारसंघांची अदलाबदल हादेखील एक प्रस्ताव आहे.

एकंदर धुळे लोकसभा मतदारसंघात मतदार स्थिती अनुकूल असूनही काँग्रेस पक्षाकडे उमेदवाराची वानवा आहे. ही अतिशय विचित्र स्थिती आहे. या मतदारसंघात सुमारे साडेचार लाख अल्पसंख्याक मते मालेगाव शहर आणि धुळे शहरात आहेत. सुमारे सात लाख मराठा समाजाची मते आहेत. हे दोन्ही घटक निवडणूक निकालावर परिणाम करणारे आहेत. कांदा, कापूस आणि अन्य शेतकरी केंद्रातील भाजप सरकारवर नाराज आहेत. त्याचा लाभ कसा घ्यावा, हा मोठा प्रश्न महाविकास आघाडीपुढे आहे.

Amrish Patel, Dhule Loksabha Constituency
Raj Thackeray On Bjp : "माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या महाराष्ट्रात...", राज ठाकरेंचा भाजपला टोला

भाजपकडे खासदार डॉ. सुभाष भामरे, प्रतापराव दिघावकर, जिल्हा परिषद सभापती धरती देवरे, माजी मंत्री राजवर्धन कदमबांडे हे प्रमुख इच्छुक आहेत. या सर्व इच्छुकांमध्ये भाजप आमदार अमरीश पटेल ज्याच्या पारड्यात वजन टाकतील, त्याला उमेदवारीची शक्यता अधिक आहे. मात्र, यातही एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी काँग्रेसकडून दोन वेळा लोकसभेसाठी उमेदवारी केलेले अमरीश पटेल (Amrish Patel) हेदेखील उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे राजकीय चित्र अतिशय वेगाने बदलत आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Amrish Patel, Dhule Loksabha Constituency
Loksabha Election 2024 : हीना गावित यांना भाजपच्या प्रस्थापितांचा विरोध; काँग्रेसमध्ये आनंदाच्या उकळ्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com