लोकसभेचा बिगुल डिसेंबरमध्ये?

 लोकसभेचा बिगुल डिसेंबरमध्ये?
Published on
Updated on

दिल्ली ः देशातील लोकसभा निवडणुकीचा बिगुल या वर्षीच्या डिसेंबरमध्येच वाजण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने देशपातळीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा भारतीय जनता पक्ष आणि सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करणारा कॉंग्रेस या दोन प्रमुख खेळाडूंमध्ये राजकारणाचा सामना रंगणार आहे; परंतु कॉंग्रेसच्या जोडीला तिसरी आघाडी येण्याची शक्‍यता आहे. 

भाजपने 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता प्रस्थापित केली. भाजपने "एनडीए'च्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित केल्यानंतर "एनडीए'मधील घटक पक्षांनी नाराजीचा सुरू आळवण्यास सुरवात केली आहे. 

शिवसेनेने तर थेट जाहीर टीका करण्यास सुरवात केली; पण केंद्रातून बाहेर पडलेले नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विशेष राज्य दर्जाचा मुद्दा करीत थेट फारकत घेतली आहे. यामुळे "एनडीए' सदस्यांमध्ये खदखद आहे. नेमक्‍या याच परिस्थितीचा फायदा उठवत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता मुखर्जी यांनी दिल्लीत नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन तिसऱ्या आघाडीला बळकटी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेसला घेऊन सर्व विरोधी आघाडी तयार करण्याच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत.

केंद्र सरकारविरुद्ध असलेल्या नाराजीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे भाजपने सध्या अनेक राज्यांत आपली सत्ता काबीज केली आहे. त्रिपुरासारख्या राज्यात सत्ता काबीज केली. त्यामुळे देशभरातील राज्यांमध्ये वाढत चाललेला भाजपचा प्रभाव पाहून त्यांनी जनतेच्या मनात असलेल्या आदराचा फायदा उठवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी डिसेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्‍यता आहे. सध्या कर्नाटकनंतर राजस्थान व मध्य प्रदेशच्या निवडणुकीचा प्रभावही लोकसभेवर उमटण्याची शक्‍यता आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com