Congress : न्याय यात्रेच्या मुहूर्तावर मिलिंद देवरांची सोडचिठ्ठी कोणता करणार परिणाम?

Shiv Sena : निवडणुकीत शिवसेनाच लढणार शिवसेनच्या विरोधात; चूरस वाढणार
Milind Deora.
Milind Deora.Sarkarnama
Published on
Updated on

सचिन देशपांडे

Milind Deora : देवरा परिवाराचे काँग्रेस सोबत 55 वर्षांचे नाते आहे. परंतु आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतून लक्ष ‘डायव्हर्ट’ करण्यासाठी थेट काँग्रेसचे सह कोषाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भारत जोडो यात्रेच्या वेळी गुलामनबी आझाद यांनी सोडचिठ्ठी दिली होती. आज मिलिंद देवरा यांनी सोडचिठ्ठीत देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित केला आहे. हे ‘टायमिंग’ कसे काय जुळले? असा प्रश्न असताना भाजपाने हे सर्व घडवून आणल्याची ओरड काँग्रेस नेते करीत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची ‘हेडलाईन’ कायम न राहता मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस सोडचिठ्ठीवर ‘फोकस’ करण्यासाठी हा उद्योग असल्याचा दावा केला जात आहे.

मिलिंद देवरा हे शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडून 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत. माजी लोकसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई दक्षिणची जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेकडे जाण्याचे गृहित धरत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. इतक्यावर ते थांबले नाहीत तर, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत ते प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अरविंद सावंत विरोधात मिलिंद देवरा अशी लढत लोकसभेत होऊ शकते. अरविंद सावंत यांच्या विरोधात उमेदवाराची ही तयारी शिंदे गटाच्या शिवसेनेने सुरू केली आहे. मिलिंद देवरा यांनी रविवारी सकाळी पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली.

Milind Deora.
INDIA Aghadi : इंडिया आघाडीत ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ; लोकसभेच्या 170 महत्वाच्या जागांचा मुद्दा...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक आणि काही नगरसेवकांसह प्रवेश करणार आहेत. काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. असे असताना मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा गंडा बांधला आहे. ‘इंडिया’ आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय काँग्रेस नेत्यांनी कुठल्याही जागेवर दावा करु नये, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे देखील मिलिंद देवरा नाराज होते. त्यांचा मतदार संघच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात जाणार असल्याने देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठीत देत शिवसेनेच्या शिंदे गटात ‘ज्वाईन’ होत शिवसैनिकांसमोर पेच निर्माण केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचा काँग्रेसला जसा फटका बसणार आहे. तसा तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाही बसेल काय? यासाठी निवडणुकीचा निकाल हेच उत्तर असेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक प्रचार सुरू केल्याने आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीत सावंत हेच उमेदवार राहणार हे निश्चित झाले आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात दिसणार आहे. मिलिंद देवरा यांच्या शिंदे च्या शिवसेनेतील प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याच्या चर्चा थांबतील.

Edtied by : Prasannaa Jakate

Milind Deora.
Milind Deora : तथास्तु...! मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडताच काँग्रेसचा बडा नेता असं का म्हणाला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com