Congress : काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी देवरा यांच्या निर्णयाला दुर्दैवी म्हणत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. तर एका बड्या नेत्यानं मात्र ‘तथास्तु’ असं म्हणत देवरा यांची आठवण काढली.
मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी सोशल मीडियात पोस्ट लिहून काँग्रेसच्या (Congress) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, आज राजकीय प्रवासातील महत्वाचा अध्याय संपला. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षासोबत माझ्या कुटुंबाचं 55 वर्षांचं नातं संपलं आहे. सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.
देवरा यांच्या या निर्णयानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनीही सोशल मीडियात पोस्ट लिहित मिलिंद देवरा यांच्या वडिलांची आठवण काढली. त्यांनी म्हटले आहे की, ‘मला मुरली देवरा (Murli Deora) यांच्यासोबतची अनेक वर्षांची साथ आठवत आहे. सर्व राजकीय पक्षात त्यांचे जवळचे मित्र होते. पण ते कट्टर काँग्रेसी होते. अनेकदा कठीण परिस्थिती ते काँग्रेस पक्षासोबत राहिले. तथास्तु!’.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, मिलिंद देवरा हे आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी ही लढाई पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडीतून या जागेचे दावेदार ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत, यामुळे देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. यामुळे आता देवरा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना जोर मिळत आहे. (Latest Marathi News)
देवरा हे काँग्रेसला मोठं खिंडार पाडण्याची शक्यता आहे. मुंबईतील 10 माजी नगरसेवक आणि 25 विद्यमान पदाधिका-यांसह देवरा यांचा आजच शिंदे गटात प्रवेशाची शक्यता आहे. देवरा यांचा दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.