Jan Suraksha Bill: 'जनसुरक्षा'वर काँग्रेसची डबल ढोलकी; सभागृहात गप्प बसणार अन् रस्त्यावर देखावा करणार

Congress shows double stand on Public Safety Bill: जनसुरक्षा विधेयक विधीमंडळात मंजूर होत असताना काँग्रेसच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात घेतलेल्या भूमिकेवरून विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, उपनेते अमिन पटेल आणि सतेज पाटील यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेस नाराज आहे.
Congress Party
Congress PartySarkarnama
Published on
Updated on

Summary

  1. विधानमंडळातील काँग्रेसची ढिसाळ भूमिका: जनसुरक्षा विधेयक मंजूर होताना काँग्रेसच्या आमदारांनी निष्क्रिय राहून सभागृहात कोणताही ठोस विरोध केला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

  2. रस्त्यावर आंदोलन आणि सभागृहात मौन: सभागृहात गप्प बसलेले नेते आता जिल्हा व तालुका पातळीवर विधेयकाविरोधात आंदोलन करताना दिसत आहेत, जे ‘डबल ढोलकी’ म्हणून ओळखले जात आहे.

  3. नेतृत्वावर शंका आणि नोटीस प्रकरण: विजय वडेट्टीवार, अमिन पटेल व सतेज पाटील यांच्या भूमिकांवरून पक्षांतर्गत नाराजी असून त्यांना नोटीसा गेल्याची चर्चा आहे, तर काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभावही जाणवतो.

विधिमंडळातील काँग्रेस आणि संघटनेतील काँग्रेस वेगळी आहे. काँग्रेसमध्ये जुन्या आणि नव्यांचा असे दोन गट शीतयुद्ध करत कधी उघड तर कधी छुप्या खेळ्या करत असल्याचे दिसले. जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मजूर झाले. या दोन्ही सभागृहांत गप्प बसलेले काँग्रेसचे आमदार आता जिल्हा व तालुका पातळीवर या विधेयकाची होळी करून विरोध करणार आहेत. सभागृहात गप्प बसणार आणि रस्त्यावर देखावा करणार, अशी डबल ढोलकी काँग्रेसचे नेते वाजविताना दिसणार आहेत.

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक अर्थात जनसुरक्षा विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर झाले. विधानसभा आणि विधान परिषदेतील महायुतीच्या अजस्त्र संख्याबळाच्या जीवावर हे विधेयक मंजूर होणारच होते. हे विधेयक मंजूर होताना काँग्रेसकडून किमान विरोध तरी अपेक्षित होता. विधानसभेत असलेल्या काँग्रेसच्या १६ आमदारांनी बघ्याची भूमिका घेतली.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार गैरहजर होते. विधिमंडळातील कामकाजापेक्षा त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महत्त्वाची वाटली. सभागृहाचे कामकाज सुरू असताना काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेत्याने मारलेली दांडी आता संशयास्पद वाटू लागली आहे. सभागृहाचे कामकाज सुरळीत व ठरल्याप्रमाणे होत नसल्याचे सांगून पक्षनेते वडेट्टीवार स्वत:ची सुटका करून घेताना दिसत आहेत. विधानसभा उपनेते अमिन पटेल यांचीही भूमिका आता रस्त्यावर लढणाऱ्या, विचाराला जागणाऱ्या काँग्रेसजनांना संशयास्पद वाटू लागली आहे.

विधानसभेतील पक्षनेत्याने दांडी मारली तर विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी विधेयकाला विरोध करायचे सोडून सभात्याग केला. त्यामुळे त्यांचीही भूमिका संशयास्पद आहे. विधान परिषदेत काँग्रेसकडे सात आमदार आहेत. या आमदारांनी किमान सभागृहात उभे राहून विरोध तरी करायला हवा होता. दोन्ही सभागृहातील काँग्रेसचे आमदार गप्प का बसले? अशी शंका दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना आणि गल्लीत काम करणाऱ्या काँग्रेसशी प्रामाणिक आणि विचारांशी बांधलेल्या कार्यकर्त्यांना येऊ लागली आहे.

जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध आहे, हे दाखविण्यासाठी विधेयकाची होळी करण्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे उपक्रम जिल्हा व तालुका पातळीवर सुरू झाले आहेत. येत्या काळात हे उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबविली जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या सभागृहात गप्प बसलेले काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदार आता रस्त्यावर येऊन मोठ्या-मोठ्या गोष्टी करताना दिसण्याची शक्यता आहे.

Congress Party
Maharashtra Congress: काँग्रेसनं कात टाकली! नवी इनिंग सुरु; 33 टक्के ज्येष्ठ, 66 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी

नोटिशींनी काय साधणार?

जनसुरक्षा विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर होत असताना काँग्रेसच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात घेतलेल्या भूमिकेवरून विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, उपनेते अमिन पटेल आणि विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेस नाराज आहे. या नाराजीतून पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून या तिघांना नोटीस काढल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे.

आम्हाला नोटीस आलीच नाही, आम्ही तरीही खुलासा देऊ, अशीच भूमिका हे नेते घेताना दिसत आहेत. या तिघांना नोटीस काढली की नाही? या बाबत सपकाळ हेच वस्तुस्थिती सांगू शकतात. राज्याच्या संघटनेत विस्कळित असलेली काँग्रेस विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहातही विस्कळित आहे.

कोणी काय करायचे? हे योग्य वेळी अधिकारवाणीने सांगणारा नेता काँग्रेसकडे नसल्याचे दिसते. नोटीस प्रकरणाचा शेवट कसा होतो? यावर संघटनेतील शिस्त ठरणार असल्याचे दिसते. भाजपला भिडणारा नेता काँग्रेसकडे सभागृहात नाही. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या माध्यमातून असा नेता संघटनेत आहे; परंतु पक्षातील दुफळी त्यांच्यासाठी आता डोकेदुखी, संशयाचे वातावरण निर्माण करणारी ठरू लागल्याचे दिसत आहे.

Congress Party
‘इंटेलिजन्स ब्युरो’मध्ये ‘गुप्तहेर’ व्हायचयं! असा करा अर्ज, शेवटची तारीख जाणून घ्या!

विरोधी पक्षनेत्याची संधी अन्‌ सभागृहातील मौन

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ अधिवेशनात झाला. विधानसभेला विरोधी पक्षनेता नाही, आता विधान परिषदेलाही विरोधी पक्षनेता नसेल. आधीच्या तडजोडीनुसार विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे, तर विधान परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. सध्याचे विधानसभेतील संख्याबळ पाहता या पदावर शिवसेनेचा दावा आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करू शकते.

काँग्रेस-शिवसेना विरोधी पक्षनेते पदांची अदलाबदली करू शकते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नोव्हेंबर २०२१मध्ये भाजपचे उमेदवार अमल महाडिक व डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध विधान परिषद सदस्य झाले.

त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सूत्रे हलल्याचे समजते. ‘त्या निवडणुकीची परतफेड की विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची ॲडजेस्टमेंट’, यामुळेच तर काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी अशी अनाकलनीय भूमिका घेतली नसावी ना, असा संशय आता उपस्थित होऊ लागला आहे.

Q1. जनसुरक्षा विधेयकावर काँग्रेसने सभागृहात विरोध केला का?
→ नाही, बहुतेक आमदारांनी मौन राखले आणि कोणताही ठोस विरोध नोंदवला नाही.

Q2. काँग्रेसचे नेते जनसुरक्षा विधेयकावर रस्त्यावर आंदोलन का करत आहेत?
→ सभागृहात निष्क्रिय राहिल्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष शांत करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.

Q3. कोणत्या काँग्रेस नेत्यांना नोटीस दिल्याची चर्चा आहे?
→ विजय वडेट्टीवार, अमिन पटेल आणि सतेज पाटील यांना नोटीस दिल्याची शक्यता आहे.

Q4. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर कोणाचे नाव चर्चेत आहे?
→ काँग्रेसचे सतेज पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com