Gokul Dairy Election 2026: 'गोकुळ'चे दूध 'तापणार'; आतापासून 'उकळी' फुटण्यास सुरवात

Gokul Dairy election likely in April 2026: ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपत आहे, तरीही आतापासूनच नगारे वाजू लागले आहेत. जिल्ह्यातील सत्ताकेंद्रापैकी प्रमुख असलेल्या ‘गोकुळ’साठी सर्वपक्षीय नेते सरसावले आहेत.
Gokul Dairy elections
Gokul Dairy electionsSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात

  1. कोल्हापूर निवडणुका पुढे: डिसेंबर अखेर जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून फेब्रुवारीत महापालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

  2. गोकुळ दूध संघावर लक्ष: एप्रिल 2026 ला मुदत संपत असूनही गोकुळ दूध संघ निवडणुकीची तयारी आत्ताच सुरू झाली आहे; ठराव धारकांच्या यादीवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

  3. राजकीय समीकरणे: हसन मुश्रीफ गट व सतेज पाटील गटात आगामी गोकुळ निवडणुकीत संघर्ष अपेक्षित असून महायुती व काँग्रेसमधील समीकरणे ठरणार आहेत.

Kolhapur News: पावसाळ्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास जिल्हा परिषद, नगरपालिका, दोन महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेर महापालिका वगळता या सर्व निवडणुका होतील. तर फेब्रुवारी महिन्यात महापालिकांच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य समजला जाणारा गोकुळ दूध संघाची निवडणूक देखील एप्रिल महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच सत्ताधारी नेत्यांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपते. मात्र आत्तापासूनच गोकुळच्या दुधाला 'उकळी' फुटायला सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यातील प्रमुख नेत्यांनी आतापासूनच आपल्या बाजूने ठराव दाखल करण्यासाठी टोकणची भूमिका घेतली आहे. मतदार यादीसाठी संस्था प्रतिनिधीच्या नावाने ठराव करण्याच्या प्रक्रियेस अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे.

सध्या 'टोकण'च्या माध्यमातून जास्तीत जास्त ठराव आपल्याकडे करण्यासाठी चढाओढ दिसत असली, तरी निवडणूक पुढे जाण्याची धाकधूकही इच्छुकांच्या मनात आहे. सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. रचना पाहता जिल्हा परिषदेची सर्वप्रथम होण्याचा अंदाज आहे. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने महापालिकेच्या निवडणुका यावेळी होण्यास शक्य नाहीत. त्यामुळे नव्या वर्षातच महापालिकेचा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबण्याची शक्यता असल्याने दुसरीकडे सत्ताधारी मंडळाकडून गोकुळ ठराव धारकांची संख्या वाढवल्याने त्यावर विरोधकांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. संस्था वाढवल्याने ठराव धारक देखील वाढले आहेत. त्यामुळे मतदार यादीवरून विरोधक न्यायालयात आव्हान देण्याची देखील रणनीती आखू शकतात. ज्या संस्था वाढल्या आहेत त्या संस्थेची दूध संकलनावरून देखील विरोधकांनी आव्हान देण्याची तयारी देखील केली आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात केल्यास त्याला किती वेळ लागेल यावर देखील गोकुळ दूध संघाची निवडणूक अवलंबून आहे.

Gokul Dairy elections
Vice President News: भाजपची खेळी! उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी. राधाकृष्णन हेच उमेदवार का? RSS, दक्षिण भारत, अन् सामाजिक समीकरण..

सध्या गोकुळच्या राजकारणात महायुती आणि परिवर्तन आघाडी म्हणून सत्तेत असलेल्या वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांचा गट आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा गट देखील आगामी निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात असू शकतो. मात्र गोकुळ मधील परिस्थिती आणि एकमेकांची मैत्री पाहता महायुतीला पूरक असे धोरण मंत्री मुश्रीफ यांना घ्यावे लागेल. पण गोकुळ मधील अंतर्गत राजकारण पाहता आमदार सतेज पाटील यांना पूरक देखील भूमिका मंत्री मुश्रीफ यांना ठेवावे लागेल, अशी चर्चा संचालक मंडळात आहे.

FAQ

प्र.1: कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका कधी होणार आहेत?
उ.1: डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

प्र.2: महापालिका निवडणुका कधी होतील?
उ.2: महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.

प्र.3: गोकुळ दूध संघ निवडणुकीत प्रमुख गट कोणते आहेत?
उ.3: मंत्री हसन मुश्रीफ यांचा गट आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा गट एकमेकांविरोधात आहेत.

प्र.4: गोकुळ दूध संघ निवडणुकीत काय वाद उद्भवू शकतो?
उ.4: ठराव धारकांची संख्या वाढवणे आणि मतदार यादीवरून विरोधकांकडून न्यायालयीन आव्हान दिले जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com