Thackeray Brothers news,: दिवाळीनंतर मोठा राजकीय धमाका होणार; ठाकरे बंधूंच्या भेटींचा सिलसिला सुरुच! 3 महिन्यात 8 वेळा भेट

Maharashtra Politics Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance after diwali: महाविकास आघाडीत (MVA) राज ठाकरे सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. दिवाळीनंतर मोठा निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance after diwali
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance after diwaliSarkarnama
Published on
Updated on
  1. मराठीच्या मुद्द्यावरून सुमारे दोन दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरे बंधू पुन्हा राजकीय व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

  2. गेल्या तीन महिन्यांत दोघांमध्ये तब्बल 8 वेळा भेट झाली असून, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.

  3. मनसे-ठाकरेसेना युतीची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, दिवाळीनंतर मोठा राजकीय निर्णय अपेक्षित आहे.

मराठीच्या मुद्द्यावरून सुमारे दोन दशकानंतर पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर उद्धव-राज ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

आगामी निवडणुकीच्या मैदानात ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरणार असल्याचं जवळजवळ निश्चित असल्याचे या भेटीगाठींवरुन स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन महिन्यात राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल 8 वेळा भेट झाली आहे. आजही भाऊबीज निमित्ताने राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर जाण्याची शक्यता आहे.

दोन दशके एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे, सभामधून एकमेकांवर तुटून पडणारे ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाल्याने आगामी निवडणुकीचा नवी दिशा मिळणार आहे. ठाकरेसेना-मनसे युती झाली तर राज्याचे वातावरण ढवळून निघणार आहे. ठाकरेंच्या राजकीय युतीची फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली आहे.

महाविकास आघाडीत (MVA) राज ठाकरे सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. दिवाळीनंतर मोठा निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance after diwali
Nana Patole: नाना पटोले आहेत कुठे? काँग्रेस नेत्यांनाही पडला प्रश्न; चर्चा, शंका अन् अफवा

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि कुटुंब मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी मनसेच्या दीपोत्सवाचे उद्धघाटन उद्धव ठाकरे यांनी केले. त्यानंतर उद्धव ठाकरे थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गेले होते. आजही उद्धव ठाकरे हे शिवतिर्थावर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते.

FAQs

1. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचं कारण काय आहे?
👉 मराठी आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू आहे.

2. उद्धव आणि राज ठाकरे किती वेळा भेटले आहेत?
👉 गेल्या तीन महिन्यांत ते सुमारे 8 वेळा भेटले आहेत.

3. या भेटींचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 ठाकरेसेना-मनसे युती झाल्यास राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

4. मोठा राजकीय निर्णय कधी अपेक्षित आहे?
👉 दिवाळीनंतर महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com