Santosh Deshmukh Murder Case : सरपंच देशमुख हत्या; तपासाची दिशा आरोप-प्रत्यारोपांमुळे भरकटणार?

Santosh Deshmukh case updates Political controversies in murder case Maharashtra Sarpanch murder news : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या कारणासाठी आणि ज्या पद्धतीने करण्यात आली, ते पाहता त्यांच्या मारेकऱ्यांना, मारेकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे तपास भरकटणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.
Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay Munde
Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

गुन्हेगारांचे समर्थन करण्याची पद्धत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. आपल्या जवळचा, आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा आदी आधारांवर गुन्हेगारांना पाठिंबा मिळू लागला आहे. त्यामुळे मग एखादे गुन्हेगारी कृत्य घडले की आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. प्रकरणाला वेगळेच फाटे फुटतात. तपासकामावर प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न यामुळे होतो. मस्साजोगचे (ता. केज, जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर असेच प्रकार सुरू झाले आहेत. या आरोप-प्रत्यारोपांत तपास भरकटणार तर नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.

संतोष देशमुख यांचा खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आला आहे. खंडणी मागण्याच्या आड आलात तर तुमची अशी अवस्था केली जाईल, असा संदेश देत समाजात दहशत पसरवण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. मात्र यामध्ये आधी जात आडवी आणण्यात आली. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय, परळीचा माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी परळी शहर बंद करीत धुडगूस घातला.

Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay Munde
Walmik Karad News : धक्कादायक : वाल्मिक कराडवर आरोप केलेल्या कंपनीतील कामगाराचा संशयास्पद मृत्यू

कराड याच्या अटकेनंतर त्याच्या पत्नी मंजिली कराड यांची एन्ट्री झाली. त्यांनी या प्रकरणात जात ओढली. मंजिली कराड यांच्यापूर्वीही या प्रकरणाला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग देण्याचा प्रयत्न झाला. तो अद्यापही सुरूच आहे आणि यापुढेही सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना आणि या कटात सामील असलेल्या सर्वांना, मग ते कुणीही असोत, कठोर शिक्षा व्हायला हवी, असा सरळ विषय आहे. त्यात अन्य मुद्दे घुसडण्याचा प्रयत्न तपासकामात विघ्न ठरण्याचा धोका आहे.

राजकीय पातळीवरही या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप झाले. बीड जिल्ह्यातून वंजारी समाजाला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत म्हणून आमदार सुरेश धस हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत, असा आरोप मंजिली कराड आणि वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडून झाला. या मुद्यावरून महायुतीत मतभेद दिसून आले. भाजपचे आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षातील महत्वाचे नेते धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभे राहिले.

Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay Munde
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT नंतर आता CIDचे अधिकारीही बदलले; काय आहे कारण

आमदार धस यांनी वाल्मिक कराड याचे नवनवीन कारनामे समोर आणले. आक्रोश मोर्चांमध्ये त्यांनी कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर हल्ल्यांची तीव्रता वाढवली. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडेही अस्वस्थ झाल्या. धस यांच्यामुळे बीडची बदनामी झाली, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणे, कराड याचे कारनामे उघड करणे, ही बीडची बदनामी कशी होऊ शकते, असा प्रश्न पंकजा मुंडे यांना पडला नाही.

कराडचे हे सर्व कारनामे सुरू होते, संतोष देशमुख यांची हत्या झाली, विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान करण्यात आले, त्यावेळी बीडची बदनामी झाली नाही का, याचे उत्तर मंत्रिपदावर असलेल्या पंकजा मुंडे यांनी द्यायला हवे. बीडची बदनामी झाल्याचा आरोप करणे हा प्रकरणाला भलतेच वळण देण्याचा प्रयत्न होता, मूळ प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होता. बीडकरांच्या विरोधात कट रचला जात आहे, अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होता. मात्र आमदार धस आणि विरोधकही मागे हटले नाहीत.

Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay Munde
Annasaheb More: गुरूमाऊलीः दिंडोरी केंद्राचा राज्यभरात विस्तार, अध्यात्म, विज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचे कसब, आता गंभीर आरोप!

सरपंच देशमुख यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी वाल्मिक कराड याच्या जवळचे असल्याचे उघड झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याला वाचा फोडली. त्यामुळे सरकारवर नामुष्की ओढवली. एसआयटीचे प्रमुख वगळता अन्य सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदलण्यात आले. त्यामुळे सरकारने आपल्या हेतूवर संशय घेण्याची संधी लोकांना उपलब्ध करून दिली.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे ऊर्फ गुरुमाऊली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराड याला स्वामी समर्थ केंद्रात आश्रय देण्यात आला होता, असा आरोप तृप्ती देसाई यांनी अण्णासाहेब मोरे यांच्यावर केला आहे. त्यामुळे वातावरण तापले होते. अण्णासाहेब मोरे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. वाल्मिक कराडशी आपला संबंध नाही, तो भाविकाप्रमाणे केंद्रात आला असेल, असे त्यांनी सांगितले. सरपंच देशमुख यांच्या खुनानंतर अशा प्रकारे आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. यामुळे तपास भरकटणार तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com