Mira-Bhayander Politics : मिरा-भाईंदरमध्ये राजकीय कोलांट्याना सुरुवात;सरनाईक-मेहता भिडणार! ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न, काँग्रेसची धुरा हुसेनांकडे

Pratap Sarnayak Narendra Mehta Muzaffar Hussain : मिरा भाईंदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा झटका उद्धव ठाकरेंना बसला आहे. त्यांच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग होत आहे.
Narendra Mehta Lead BJP Pratap Sarnayak Shivsena Muzaffar Hussain
Narendra Mehta Lead BJP Pratap Sarnayak Shivsena Muzaffar Hussainsarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Mira-Bhayander News : मिरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर नाही. महापालिकेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. मात्र, निवडणुकीचे पडगम शहरात वाजायला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकजण पक्ष बदलताना दिसत आहेत. यात भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक सूर्यकांत म्हात्रे यांनी भाजपमध्ये तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख गजेंद्र रकवी व युवा सेनेचे पदाधिकारी संकेत रकवी यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या राजकीय कोलाट्यांना सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात त्याला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. मिरा भाईंदर महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारीत होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राजकीय पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात व केंद्रात भाजपचे सत्ता आहे तसेच मुदत संपलेल्या मिरा भाईंदर महापालिकेतही भाजपची एकहाती सत्ता होती. त्यामुळे साहजिकच भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेनेही ताकद वाढविण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. त्यामुळे शिवसेनेत जाऊन नशीब अजमावणाऱ्यांची संख्या कमी नाही.

भाजपचे काही पदाधिकारीही शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. काँग्रेसची ताकद शहरात मर्यादित असल्याने काही कार्यकर्त्यांचा अपवाद वगळला तर एकही नाववाला राजकीय नेता अद्याप काँग्रेसमध्ये गेलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राजकीय ताकद तर काँग्रेस पेक्षाही कमकुवत आहे. परिणामी सध्या भाजपमध्ये इच्छूकांची भाऊ गर्दी झाली आहे. माजी नगरसेवक पुन्हा आपल्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेतच शिवाय बाहेरुन पक्षात आलेले देखील उमेदवारीच्या अपेक्षेने गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

Narendra Mehta Lead BJP Pratap Sarnayak Shivsena Muzaffar Hussain
Nashik NMC Election : पंचवटी विभागात भाजपच्या गणेश गितेंच्या सोयीचे आरक्षण ; खोडे, खेताडेंचा पत्ता कट

भाजपची धुरा नरेंद्र मेहतांवर

महापालिका निडणुकीसाठी भाजपची धुरा आमदार नरेंद्र मेहता यांच्या खाद्यावर देण्यात आली आहे. पक्षाकडून तशी अधिकृत घोषणाही झाली आहे. गेल्या निवडणुकीत ९५ पैकी भाजपचे ६१ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे भाजपने महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यात नरेंद्र मेहता यांचा सिंहाचा वाटा होता. आता भाजपने शिंदेंच्या शिवसेनेतील काही नगरसेवक आपल्यात समावून घेतले आहेत. त्यामुळे यावेळी ६१ चा आकडा पार करण्याचे दावे पक्षाकडून करण्यात आले आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप जैन असले तरी पक्षाचे बहुतांश निर्णय मेहता हेच घेत असतात. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असल्याने निवडणूकीची जबबदारी मेहता यांनाच दिली जाणार हे निश्चितच होते.

शिवसेनेची जबाबदारी सरनाईकांवर

शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण मदार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरच आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनीदेखील पक्षवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. माजी आमदार गीता जैन यांचे खंदे समर्थक असलेल्या काहीजणांनी सरनाईक यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. ठाकरे गटातील माजी नगरसेविका निलम ढवण तसेच शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी नगरसेवक यांचा अपवाद वगळता ठाकरेंचे बहुतांश नगरसेवक आपल्याकडे वळविण्यात सरनाईक यांना यश आले आहे. विकासकामांसाठी हजारो कोटींचा सरकारी निधी मिरा भाईंदरमध्ये आणल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आहेतच शिवाय मंत्रिपदाचाही त्यांना विशेष फायदा होत आहे.

मुझफ्फर हुसेन काँग्रेसचे सर्वेसर्वा

माजी आमदार प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. पक्षाची मर्यादित असलेली ताकद वाढविण्याचा त्यांचा सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहे. गेल्या निवडणुकित काँग्रेसचे अस्तित्व मिरा रोडच्या नयानगर व आसपासच्या परिसरापुरतेच मर्यादित राहिले होते. मात्र आपली कक्षा रुंदावण्यासाठी देशपातळीवर काँग्रेसने लावून धरलेला मतचोरीचा मुदा हुसेन यांनी मिरा भाईंदरमध्येही प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली असून त्यासाठी समाजमाध्यमांचाही ते खुबीने वापर करत आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेची अस्तित्वाची लढाई

गेल्या निवडणुकित एकत्रित शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आले होते. सध्या मात्र त्याची संख्या केवळ एकवर आली आहे. अनेक पदाधिकारी देखील पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. परंतू भाजपचे नरेंद्र मेहता व शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांच्याशी टक्कर देणारे नेतृत्व ठाकरे गटाकडे स्थानिक पातळीवर नाही ही पक्षाची खरी अडचण आहे.

Narendra Mehta Lead BJP Pratap Sarnayak Shivsena Muzaffar Hussain
Ajit Pawar Solapur politics : राजन पाटील-यशवंत मानेंच्या धक्क्यानंतर अजितदादा सोलापुरात करणार मोठा भूकंप, 'या' बड्या नेत्याचं इन्कमिंग?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com