Suresh Dhas : 'ती' भेट गुप्त, त्यामुळे झालेले 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी आमदार धसांचे 'उघड' प्रयत्न

Suresh Dhas and Dhananjay Munde Meeting : संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपींच्या विरोधात रान पेटवणारे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे समोर आले आणि त्यांची विश्वासार्हता पणाला लागली. आरोपी हे मुंडे यांच्या पक्षाचे, त्यांचे निकटवर्तीय आहेत. या गुप्त भेटीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी धस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
Suresh Dhas, Santosh Deshmukh, Dhananjay Munde, Chandrashekhar Bawankule
Suresh Dhas, Santosh Deshmukh, Dhananjay Munde, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 27 Feb : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे आष्टीचे (जि. बीड) भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत, हे त्याचे कारण आहे.

विशेष म्हणजे, धस-मुंडे भेटीची माहिती भाजपचेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सार्वजनिक केली होती. आता आमदार धस यांनी 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी व्यवस्थित प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा फायदा होईल का, हा मोठा प्रश्न आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या खुनानंतर राज्यभरात संताप निर्माण झाला होता. या संतापाच्या लाटेवर आमदार धस स्वार झाले.

त्यांनी सभागृहात या खुनाला वाचा फोडली. सत्ताधारी आमदार असूनही अशी भूमिका घेतल्यामुळे आमदार धस यांचे राज्यभरात कौतुक झाले. मुद्देसूद मांडणी आणि त्याला बोलण्याची मोकळीढाकळी पद्धत यामुळे धस घराघरांत पोहोचले. भाजपला (BJP) याचा मोठा फायदा झाला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज भाजपपासून काहीसा दुरावल्याचे चित्र होते. हे चित्र बदलण्यात धस यांच्यामुळे यश आले.

अर्थात, आमदार धस यांनी जी भूमिका घेतली होती, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पाठिंबा होताच. भाजपमध्ये शिस्त आहे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय अशा संवेदनशील मुद्द्यावर कुणी काही बोलत नाही. लोकांच्या हे लक्षात आले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमाही उजळून निघाली. कोंडी झाली ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांची.

काही दिवसांनी आमदार धस यांनी मंत्री मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती बाहेर आली आणि या सर्वांवर पाणी फेरले गेले. धस यांच्यावर चौफेर टीका झाली. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांचीच गुप्त भेट घेणे, हे समाजमनाला पटले नाही. टीकेची झोड उठल्यानंतर धस यांनी स्पष्टीकरण दिले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. मग धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याआधी त्यांनी राजीनाम्याची मागणी केली नव्हती.

Suresh Dhas, Santosh Deshmukh, Dhananjay Munde, Chandrashekhar Bawankule
Nashik Guardian Minister Post : अखेर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; भाजपच्या नेतृत्वाने शिंदे-अजितदादांना स्पष्टच सांगितलं

त्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग येथे जाऊन भेट घेतली आणि तेथूनच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या. संतोष देशमुख यांच्या खुनाचा खटला लढण्यासाठी सरकारने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. मी पत्र दिले होते, त्यामुळेच अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असा दावा आमदार धस यांनी केला आहे.

महसूलमंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी धस-मुंडे भेटीची माहिती सार्वजनिक का केली, याचे विविध अंदाज बांधण्यात आले. आमदार धसांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी त्यांना पुन्हा तोंडावर पाडले होते. भाजपमधील हा अतंर्गत संघर्ष आहे की, नाराज झालेल्या ओबीसी समाजाची मनधरणी करण्याचा प्रयत्न होता, की आमदार धस यांची वाढती लोकप्रियता त्यांच्याच पक्षातील काही लोकांना आवडली नव्हती, असे विविध प्रश्न उपस्थित झाले होते.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

परिस्थिती, घडामोडी गोंधळात टाकणाऱ्या होत्या. संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात आमदार धस यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला, अशीही चर्चा आहे. आमदार धस यांचे महत्व राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही वाढले होते. धनंजय मुंडे हे ओबीसी आहेत. ओबीसी हा भाजपचा प्रमुख आधार आहे.

Suresh Dhas, Santosh Deshmukh, Dhananjay Munde, Chandrashekhar Bawankule
Pune Swaragate Bus Stand : "हे पाहून जीव जळतोय..." स्वारगेट ST स्थानकात तोडफोड केलेल्या वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले...

त्यामुळेच आमदार धस यांना नियंत्रणात ठेवण्याचा आणि त्यांची विश्वासार्हतेला धक्का देण्याचा प्रयत्न झाला. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न आमदार धस यांच्याकडून सुरू आहे. आमदार धस यांनी 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला आहे. ते मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत, त्यांचा राजीनामा मागत आहेत. दोषी असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका धनंजय मुंडे यांच्या पक्षाने घेतली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे मुंडे यांचा राजीनामा घेऊ शकतात. मात्र त्यांनी चेंडू अजितदादांच्या कोर्टात ढकलला आहे. अशा परिस्थितीत आमदार धस यांनी मुंडेंचा राजीनामा मागून काहीही होणार नाही. आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांची गुप्त भेट का घेतली, याचे समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे 'डॅमेज कंट्रोल' कामी येईल का, असा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com