तेलगी प्रकरणात मला गुंतवण्याचा डाव मोपलवार यांचा होता  -आमदार गोटे         

telgi-gote-mopelwar
telgi-gote-mopelwar
Published on
Updated on

  मुंबई    :  " कोट्यवधी रुपयाच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याच्या प्रकरणाशी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार निगडित होते.मला गुंतवण्याचा डाव मोपलवार यांचा होता, "असा आरोप   बुधवारी भाजप आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला   . 

अनिल गोटे म्हणाले की, "  केंद्रीय गृहमंत्री.राजनाथ सिंग आणि पंतप्रधान कार्यालयात  मी  मोपलवार यांच्या विरोधात 7 जानेवारी 2017 ला  तक्रार केली होती.  मोपलवार यांच्या 800 कोटी रुपयांच्या  संपत्तीचा सगळा  हिशोब पंतप्रधान कार्यालयात दिला आहे. एक  तोट्यात असलेली कंपनी सात  आयएएस अधिकाऱ्यांनी विकत घेतली. त्यात मोपलवार यांचाही समावेश आहे .   या कंपनीला लगेच वर्षात फायदा झाला. काही अधिकाऱ्यांनी हे पैसे समृद्धी मध्ये गुंतवले आहेत. त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून याची चौकशी केली पाहिजे . "

     " कायदेशीर जबाबदारी स्वीकारून मी बोलत आहे.. मी फक्त शोरूममधला माल दिला आहे. गोडाऊन बाकी आहे .    मोपलवार यांनी  सतीश मांगले यांना किडनॅप केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी मोपलवारना  वाचवतात ,"असा आरोप गोटे यांनी केला.              

 " माजी मुख्यमंत्री कै .विलासराव देशमुख यांनी  त्याचवेळी मोपलवार याना  शिक्षा दिली असती  तर ही वेळ आली नसती . तसेच तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी मोपलवार याला वाचवले.काँग्रेस -राष्ट्रीवादीच्या आघाडी  सरकारमध्ये मोपलवार यांनी  खूप अवैध पैसा कमावला, " असा आरोप आमदार गोटे यांनी केला . 

तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणात आपण सध्या न्यायालयातून जामिन मिळाल्याने  तुरुंगातून बाहेर आहोत असेही आमदार गोटे यांनी  एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com