Mumbai Lok Sabha 2024: शिवसेनेच्या होम पिचवर 'सामना' रंगणार; 'पॅराशूटने लँड' झालेल्यांना भूमिपुत्रांकडून आवाहन

Maharashtra Lok Sabha Election 2024:मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना असा सामना होणार आहे, तर तीन ठिकाणी भूमिपूत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दावर लढत होत आहे.
Mumbai Lok Sabha 2024
Mumbai Lok Sabha 2024Sarkarnama

Mumbai News: मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघात (Mumbai Lok Sabha Election 2024) ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना असा सामना होणार आहे, तर तीन ठिकाणी भूमिपूत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा चर्चेत आहे.

मुंबईमधील सहाही लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक काळ काँग्रेसच्या ताब्यात होते. 2014 नंतर मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद कमी पडत गेली. दशकापूर्वी सहापैकी सहाही जागांवर वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला या लोकसभेत केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागत आहे.

पियूष गोयल-भूषण पाटील

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापले आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. गोयल हे मतदारसंघातील नसून त्यांनी थेट निवडणूक लढवलेली नाही. गोयल यांच्याविरोधात स्थानिक असलेले भूषण पाटील हे रिंगणात आहेत. त्यांचा परिसरात दांडगा संपर्क आहे. दुसरीकडे गोयल यांच्यामागे पक्षाची ताकद मोठी आहे, पण बाहेरचा विरुद्ध स्थानिक यावर येथील लढत होत आहे.

Mumbai Lok Sabha 2024
Mumbai Riot: मुंबई दंगलः बाळासाहेबांचीच फाइल कशी विसरली? हा प्रश्न राज ठाकरे विचारणार का?

उज्ज्वल निकम-वर्षा गायकवाड

भाजपने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याविरोधात उत्तर मध्य मुंबई मतदार संघात उतवले आहे. मुळचे जळगावचे असलेले निकम यांचा मुंबईशी थेट संपर्क नाही, तर गायकवाड यांच्या मुंबईच्या राजकारणात अनेक वर्षापासून सक्रिय आहे. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड दक्षिण मध्य मुंबईचे दोन वेळा खासदार झाले आहेत. वर्षा गायकवाड यांनी धारावीमधून विधानसभा निवडणूक जिंकली आहे.

राहुल शेवाळे-अनिल देसाई

शिवसेना शिंदे गटातील नेते, विद्यमान खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) हे दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवत आहेत. त्यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना रिंगणात उतरवले आहे. देसाई हे प्रथमच थेट जनतेतून निवडणूक लढवत आहेत. देसाईंचा मतदारसंघाशी फारसा संबध नाही, तर राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार असून स्थानिक उमेदवार आहेत.

मुंबईतील या तीनही मतदारसंघात स्थानिक विरुद्ध पॅराशूटने लँड झालेले नेते (बाहेरचे नेते) असा सामना होत आहे. शिवसेनेच्या होम पिचवर लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबई व ठाणे जिल्ह्यातील पाच लोकसभा मतदारसंघात (दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण) थेट ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये चुरशी लढत होत आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमधील लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Edited by: Mangesh Mahale

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com