Madha Loksabha News: मोहिते पाटलांना उमेदवारी,राष्ट्रवादीत नाराजीचा भडका; अभयसिंह जगताप बंडाच्या तयारीत

Loksabha Election 2024 : सध्या महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे माढा लोकसभेसाठी तिकीट हे अकलूजच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
Dhairyashil Mohite Patil  - Sharad Pawar - Abhaysinh Jagtap
Dhairyashil Mohite Patil - Sharad Pawar - Abhaysinh Jagtap Sarkarnama

केराप्पा काळेल-

Madha Loksabha News : माढा लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. रणजितसिंह निंबाळकरांच्या यांच्या उमेदवारीवरून माढ्यात मोठं नाराजीनाट्य रंगलं आहे.त्याच धर्तीवर मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला राम-राम करत पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील Dhairyashil Mohite Patil हे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले आहे.पण आता मोहिते पाटलांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत नाराजीचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून निष्ठेचा विचार न करता आयत्या उमेदवाराला तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप हे नाराज झाले आहेत.वरकुटे- मलवडी येथे काल (शुक्रवारी) रात्री झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांच्या भावना ऐकल्यानंतर अपक्ष लढायच की पक्षातून? याचा निर्णय दोन दिवसात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच शरद पवार आणि पक्षाने माझ्या निष्ठेचा विचार केला नसल्याची खदखद ही अभयसिंह जगताप यांनी बोलून दाखवली. (Madha Loksabha Election 2024)

Dhairyashil Mohite Patil  - Sharad Pawar - Abhaysinh Jagtap
Loksabha Election : तिकीटासाठी सोडले उपजिल्हाधिकारी पद, पक्षाने उमेदवारीच दिलीच नाही

अभयसिंह जगताप म्हणाले, माढा मतदारसंघाचे प्रश्न डोक्यात घेऊन, देशपातळीवरील प्रश्न विचारात घेऊन मी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. मात्र, पक्षाला आणि पवार साहेबांनी माझ्यावर अद्यापपर्यंत विश्वास दाखवला नाही. कदाचित मीच तो विश्वास संपादन करण्यासाठी कमी पडलो असेन. त्यामुळेच पवार साहेबांच्या डोक्यात अभय जगतापला तिकीट देण्याचा विचार आला नसावा, अशा भावना जगताप यांनी व्यक्त केल्या.

त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार आपण पक्षातून लढायचं की जनतेतून? याबाबतचा निर्णय दोन दिवसांत होईल. कदाचित तो तुमच्या सगळ्यांच्या इच्छेनुसारच असेल ,असेही जगताप यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे माढा लोकसभेसाठी तिकीट हे अकलूजच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत.

शुक्रवारी (ता.12) रात्री झालेल्या वरकुटे-मलवडीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, माण खटाव, कोरेगाव या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जगताप यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी काहीही झालं तरी लढायचचं, पवार साहेबांनी तिकीट दिलं नाही तर अपक्ष का होईना पण लढायचचं, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती.

त्याचबरोबर शरद पवार (Sharad Pawar) यांनी अभयसिंह जगताप यांच्या निष्ठेला ओळखून त्यांना संधी द्यायला हवी. जे कार्यकर्ते आधी पक्षाच्या विरोधात होते, त्यांना किंमत देऊन निष्ठावंतांना डावलू नये. सगळे सोडून जात असताना अभय दादांनी पवार साहेबांचा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा खांदा मजबूत करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना वगळून शरद पवार यांनी आयत्यावेळी पक्षात येणाऱ्यांना तिकीट देऊ नये, अशी मागणी केली.

Dhairyashil Mohite Patil  - Sharad Pawar - Abhaysinh Jagtap
Chhatrapati Sambhajinagar Constituency : संभाजीनगर जिंकू शकतो, भाजपचा दावा; पण जागा शिंदे सेनेलाच..!

शरद पवार यांची डोकेदुखी वाढवणार?

तिकिटासाठी अद्यापपर्यंत विचार न झाल्याने अभयसिंह जगताप हे नाराज आहेत. त्यानुसार त्यांनी वेळप्रसंगी बंड करण्याचे संकेत देखील दिले आहेत. त्यामुळे अभय जगताप यांचे होऊ घातलेले बंड शरद पवार यांची माढा लोकसभा मतदार संघाच्यादृष्टीने डोकेदुखी वाढवणार का याची उत्सुकता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Dhairyashil Mohite Patil  - Sharad Pawar - Abhaysinh Jagtap
Lok Sabha Election 2024 : कंगनाकडून विक्रमादित्य सिंह यांच्याविषयी मोठा दावा; पुन्हा तापलं राजकारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com