Nashik Constituency 2024 : 20 दिवस, 20 लाख मतदार… उमेदवारीचे धाडस कोण करणार?

Lok Sabha Election : महायुती स्वतःच विणलेल्या राजकीय जाळ्यात अडकल्याची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आज अर्ज दाखल केला. पण अद्याप महायुतीचा उमेदवार गुलदस्त्यात आहे.
Nashik Constituency 2024
Nashik Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena News : जागावाटप आणि उमेदवार यामध्ये स्वतःच विणलेल्या जाळ्यात महायुती अडकली आहे. त्यामुळे नाशिक मतदासंघांचा (Nashik Constituency 2024) निर्णय रखडला आहे. आता उमेदवारी ज्याला जाहीर होईल, तो तरी उमेदवारी घेण्याचे धाडस करील का? अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या प्रचाराची एक फेरी पूर्णही झाली आहे. त्यामुळे महायुतीचा प्रचार कधी सुरू होणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नाशिक आणि दिंडोरी दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आज आपले शक्तिप्रदर्शन करणार आहे. ते आजच उमेदवारी अर्जदेखील दाखल करतील. त्यामुळे प्रतिस्पर्धी महायुतीचा (Mahayuti) उमेदवार स्पर्धेत असल्याचा मागमूसही नाही. अशा स्थितीत गेले महिनाभर शिवसेना ठाकरे गटाचे वाजे यांनी सबंध मतदारसंघात आपल्या प्रचाराची फेरी पूर्ण केली आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले आहेत. अशा स्थितीत महायुतीचा उमेदवार व त्याचे पाठीराखे कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Nashik Constituency 2024
Nashik Lok Sabha: राजाभाऊ वाजे म्हणाले; ...तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही!

महायुतीमध्ये नाशिक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. प्रारंभीच्या काळात विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी उमेदवारी मिळणारच, या अपेक्षेने नियोजन केले होते. त्यांनी मतदारसंघात दोन महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेतल्या होत्या. मात्र, पहिल्यांदाच स्पर्धेत आल्याने त्यांना तेवढेच विरोधकही तयार झाले. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या कालावधीत त्यांच्यापासून अंतर ठेवले होते. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाचे नेते उमेदवारीसाठी इच्छुक झाले. निवृत्ती अरिंगळे यांनी दावा केला होता. त्यानंतर ओबीसी कार्ड खेळत राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव निश्चित झाल्याचे चर्चा सुरू झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघावर भारतीय जनता पक्षानेदेखील दावा केला होता. भाजपचे (BJP) अनेक इच्छुक गेल्या वर्षभर उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक दिनकर पाटील, आमदार सीमा हिरे, लोकसभा संघटक केदा आहेर हे प्रमुख होते. मतदारसंघ भाजपाला सोडण्यात यावा, यासाठी भाजपचे शहरातील सर्व तीन आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे दबाव निर्माण केला होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार विद्यमान खासदार शिंदे गटाचा असल्याने या जागेवर प्राधान्याने शिंदे गटाचा उमेदवार असेल, असे संकेत होते. त्यामुळे भाजपचे इच्छुकही नाउमेद झाले.

महायुतीच्या घटक पक्षांना मतदारसंघ आपल्यालाच हवा, या दिशेने महायुतीचे वर्तन राहिले आहे. महायुतीच्या इच्छुकांनी उमेदवारी मलाच मिळावी, या इर्षेने इतरांना प्रखर विरोध केला. या वादात दीड महिन्याचा कालावधी निघून गेला आहे. आता महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारात कितीतरी पुढे निघून गेले आहे. मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अन्य विषयावर महायुती विरोधात नाराजी आहे. अशा स्थितीत ज्याला उमेदवारी मिळेल, त्याला वीस दिवसांत वीस लाख मतदारांना कसे प्रभावित करावे, हा यक्षप्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळेल तोही चिंतेत आणि जो उमेदवारी मागत आहे, तो आणखी जास्त चिंतेत अशी स्थिती आहे. त्यामुळे आजच्या स्थितीला महायुतीने महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना चाल तर दिली नाही ना? अशी राजकीय स्थिती आहे.

नाशिक मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे शहरात तीन आमदार आहेत. देवळाली आणि सिन्नर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. इगतपुरी मतदारसंघात काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आहे. या स्थितीत शहरातील माजी नगरसेवक, आमदार यांची सर्वाधिक संख्या भाजपची आहे. उमेदवारी मात्र शिंदे गटाला अशी स्थिती असेल. उमेदवारीसाठी या दोन्ही पक्षांमध्ये एवढा वादविवाद झाला आहे की, उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराची घडी कशी बसणार, हा प्रश्न असेल. त्यासाठी नेत्यांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतील. किमान एक आठवड्याचा कालावधी त्यात जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निवडणूक अगदी तोंडावर असताना तीन आठवड्यांचा कालावधी उमेदवारीला पुरेसा ठरेल का? हादेखील मोठा प्रश्न आहे.

R

Nashik Constituency 2024
Chhagan Bhujbal News : पंतप्रधानांबद्दल 'ते' वक्तव्य केल्यानं भुजबळांनी जरांगेंचा घेतला समाचार; म्हणाले, "अक्कल अन्..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com