Chhagan Bhujbal News : पंतप्रधानांबद्दल 'ते' वक्तव्य केल्यानं भुजबळांनी जरांगेंचा घेतला समाचार; म्हणाले, "अक्कल अन्..."

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा किंवा विरोध केलेला नाही.
Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मराठा आरक्षणाचे ( Maratha Reservation ) नेते मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वक्तव्य एक व्यक्तव्य केले होते. त्यावरून भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांना डिवचलं आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच निवडणुकी संदर्भात वक्तव्य केले होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे. मराठा समाज आरक्षण नाकारल्यामुळे राज्य शासनावर नाराज असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

यावर भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी जरांगे-पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. "जरांगे म्हणजे काय पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या पेक्षाही मोठा नेता ना? म्हणून अख्खा देश घाबरला आहे, त्या जरांग्याला," असा एकेरी उल्लेख करत भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला.

"जरांगे काय सांगतोय, काय बडबड करतोय, त्याची अक्कल आणि हुशारी यावर काय बोलावे?" असा टोमणा देखील भुजबळ यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ म्हणाले, "जरांगे-पाटील नाशिक आणि बीडमध्ये म्हणतात की, 'ही खुली जागा आहे. येथे ओबीसी उमेदवार कसे काय?' यावरून त्यांचे ज्ञान कळते. त्यांना एव्हढे देखील माहित नाही की, लोकसभा आणि विधानसभेला ओबीसी आरक्षण नाही. मी देखील येवल्यातून खुल्या जागेवरूनच निवडून येतो."

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Chhagan Bhujbal News : उद्धव ठाकरे अन् शरद पवारांबद्दल जनतेत सहानुभूतीची लाट; भुजबळांचं मोठं विधान

दरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा किंवा विरोध केलेला नाही. तसेच, कोणीही मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील उमेदवार उभा करायचा नाही, असे स्पष्ट केलेले आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा अप्रत्यक्षपणे चर्चेत आहे. त्याचा मतदानातून देखील परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ आणि जरांगे-पाटील यांच्यातील हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Chhagan Bhujbal News: बीडमध्येच लक्ष घाला; भुजबळांचा पंकजाताईंना सल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com