मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेवर कॉंग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेने यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्यास कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यापूर्वी शिवसेना "एनडीए' मधून बाहेर पडली होती व राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने तिघा पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार बनवले आहे. संसदेत सत्तारुढ भाजपने संमत करवून घेतलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे घटनाविरोधी व लोकशाहीविरोधी आहे, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.
तरीही ज्या पद्धतीने शिवसेनेने आपल्या राज्यातील सहकारी पक्षांना विश्वासात न घेता विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला आहे ते अनैतिक आहे. त्यामुळे शिवसेनेने किमान समान कार्यक्रमाला बाजूला सारून अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा दिला आहे, हेच दिसून येते. त्यामुळे याबाबत शिवसेनेने खुलासा केला पाहिजे, असेही खान यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधेयकाला पाठिंबा देण्याचा शिवसेनेचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.