
Beed News: फुटीरांना अद्दल घडविण्याचा इरादा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यभर फिरत आहेत. पहिल्या टप्प्यांत जुने साथीदार छगज भुजबळ यांच्या मतदारसंघात जाऊन इशारे दिल्यानंतर पवारसाहेब गुरूवारी बीडमध्ये जाऊन कृषीमंत्री धनंजय मुंडेंविरोधात बंडखोरीविरोधात आवाज उठवणार आहेत.
पवारसाहेबांच्या या सभेकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या असून, या सभेत धनंजय मुंडेंना पर्यायही शोधला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे सभेच्या व्यासपीठावर पवारसाहेबांसोबत कोण नेते असतील, त्यातही पवारांच्या शेजारांच्या खुर्च्यांत कोण बसणार, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात, पवार हे मुंडेंना पर्याय शोधणार का, तसा नेता पवारांच्या हाती लागणार का, याकडेही लक्ष असेन.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'बंडा'च्या वादळानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार आता पुन्हा मैदानात उतरले असून ते महाराष्ट्रभर दौरा करत बंडखोरांचे राजकीय मोपमाप करणार आहेत. या दौऱ्याची सुरवातच ते बीडमधून करणार असून १७ ऑगस्टला बीडमध्ये पवारांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचा राजकीय दृष्ट्या 'वजनदार' नेता धनंजय मुंडेंनी अजितदादांना साथ दिल्यामुळे मराठवाड्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.
पक्षात पडलेल्या फुटीमुळे कार्यकर्तेही दोन गटात विभागले गेले. त्यामुळे पुन्हा पक्षाची संघटना मजबूज करण्यासाठी आणि नव्या कार्यकर्त्यांची फौज उभा करण्यासाठी पवार राज्यभर दौरे करत आहेत.
याचवेळी ते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावाही घेत आहेत. ज्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांना साथ दिली तेथे आता पवार दुसरा पर्यात शोधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बीडमध्ये पवार काय पर्याय शोधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांच्या ज्या-ज्या वेळी बीडमध्ये सभा झाल्या, त्या-त्या वेळी व्यासपीठावर पवार साहेबांच्या शेजारीच्या खुर्चीवर धनंजय मुंडे पाहायला मिळायचे. मात्र, धनंजय मुंडे अजितदादांबरोबर गेल्यामुळे बीडमध्ये होणाऱ्या सभेच्या व्यासपीठावर शरद पवारांच्या शेजारील खुर्चीवर कोणता नेता असणार, याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.