NCP Politics : 'पिपाणी'मुळे वाढले, 'तुतारी'चे टेन्शन!

NCP Sharadchandra Pawar Party Leader in Tension : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तुतारी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
NCP Sharadchandra Pawar Party
NCP Sharadchandra Pawar Party Sarkarnama
Published on
Updated on

NCP Sharadchandra Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आलेल्या तुतारी चिन्हाला विरोधकांनी पिपाणी दाखवून चांगलेच आव्हान दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून तुतारीचा प्रभाव कमी करण्याचे डावपेच आखले जात आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तुतारी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

येत्या चार महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ग्रामीण भागात चांगलेच लक्ष घालावे लागणार आहे. राष्ट्रवादीची तुतारी ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत कशी पोहोचली जाईल यादृष्टीने तयारी सुरु झाली आहे.

ग्रामीण भागामध्ये मोठे आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दहा जागा या ग्रामीण भागांमध्ये होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांना संभ्रम करण्यासाठी पिपाणी या निशाणीवर उमेदवार उभे केले गेले.

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan sabha Election) देखील विरोधकांकडून ही ट्रिक वापरली जाऊ शकते. त्यामुळे या ट्रिकमुळे लोकसभा निवडणुकीत मतं विभागली गेली. यामुळे ग्रामीण भागात तुतारी ही निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसमोर आहे.

NCP Sharadchandra Pawar Party
Sharad Pawar: पवारांच्या डावपेचांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं, माढ्यापासून नगरपर्यंत लावली फिल्डिंग

आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) आठ उमेदवार उभे होते. आठही उमेदवार चांगल्या मतांनी विजयी झाले. असे असले तरी पिपाणी या चिन्हाने उमेदवारांसमोर मोठे आव्हान निर्माण केले.

दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे निवडणून आले असले तरी त्यांच्या विरूद्ध उभे असलेले ज्यांच्याकडे पिपाणी हे चिन्ह होते असे बाबू सदू भगरे यांना जवळपास एक लाख तीन हजार मते मिळाली. माढामध्ये सुद्धा घोटूकडे यांनी पिपाणी चिन्हावर 58 हजार मते मिळवली. तसेच बीडमध्ये अशोक थोरात यांनी 54 हजार मते मिळवली.

NCP Sharadchandra Pawar Party
NCP Sharad Pawar : लोकसभेच्या निकालाने अनिल कदम जोमात, दिलीप बनकरांचे टेन्शन वाढलं!

दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये गोरख पाळेकर यांना 44 हजार मते मिळाली. सातारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 35 हजार मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात यश गाडे यांना जवळपास 37 हजार मतदान पिपाणी निशाणीवर झाले.

बारामतीमध्ये सुद्धा पिपाणीच्या उमेदवाराला 14 हजार मतांचे मताधिक्य मिळाले. यावरून विधानसभा निवडणुकीत पिपाणी या चिन्हाचा फटका तुतारीला बसू शकतो. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन फटका बसण्या आधीच त्याच्यावर रणनिती आखली जात आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com