राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेत; आव्हाड म्हणतात, ‘मला हे मान्य नाही’!

खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत; ता. ३० जानेवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होणार
Amol kolhe
Amol kolhesarkarnama
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी Why I Killed Gandhi या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेवरून नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या, त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही, असा इशाराच आव्हाड यांनी कोल्हे यांना दिला आहे. (NCP's MP Amol Kolhe will play the role of Nathuram Godse)

अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये Why I Killed Gandhi हा चित्रपट स्वीकारला होता. यात कोल्हे हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत असणार आहेत. त्यावेळी कोल्हे हे कोणत्याही पक्षात सक्रीय नव्हते. तसेच, कोणत्याही मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नव्हते. या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ मध्ये सुरू झाले होते. तो पूर्ण होऊन आता प्रदर्शनासाठी तयार झालेला आहे. येत्या ३० जानेवारी रोजी हा चित्रपट ओटीटीच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. त्यांची ही भूमिका वादात सापडण्याची चिन्हे आहेत. कारण, कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गांधी-नेहरुंची विचारधारा मानणारा पक्ष आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या या भूमिकेला पक्षातूनच विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Amol kolhe
किरण माने, सतीश राजवाडे जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला; बैठकीसाठी अमोल कोल्हेंचा पुढाकार!

कोल्हे यांच्या भूमिकेला पक्षातूनच डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शविला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पक्षाचा आणि सर्वांचा काही संबंध असतो, असे मला वाटत नाही. राज्यातील कुठल्याही कलाकाराने नथुराम गोडसेची भूमिका करावी, हे मला पटलेले नाही. अभिनय हा वरवर करता येत नाही. एक कलाकार या नात्याने अमोल कोल्हे यांनी ती भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या, त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनीच टोकाचा विरोध कोल्हे यांच्या या भूमिकेला दर्शविला आहे, त्यामुळे हा वाद पुढे कोणते वळण घेते, हे पाहावे लागणार आहे.

Amol kolhe
उद्धव ठाकरे-अजितदादांना अभिप्रेत असलेली आघाडी दापोलीत यशस्वी

त्यावेळी मी राजकारणात नव्हतो : अमोल कोल्हे

दरम्यान, Why I Killed Gandhi या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत खासदार कोल्हे म्हणाले की, या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ मध्ये झाले होते. त्यावेळी मी राजकारणात नव्हतो, तसेच कोणत्याही मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत नव्हतो. कलाकार एखादी भूमिका करतो म्हणजे तो शंभर टक्के त्या विचारधारेशी सहमत असतोच, असे नाही. काही भूमिका आपण संबंधित विचारधारेशी सहमत नसतानाही करत असतो. एक कलाकार म्हणून भूमिका करणे आणि राजकारणाशी संबंध जोडणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत. एक व्यक्ती म्हणून मला वैचारिक भूमिका आहे. तो चित्रपट मी चार ते पाच वर्षांपूर्वी केलेला आहे, त्यामुळे त्यात काय आहे, ते मलाही ३० तारखेलाच कळणार आहे.

Amol kolhe
सोलापुरात ‘राष्ट्रवादी पुन्हा...’ : २३ जागा जिंकत पटकावला पहिला क्रमांक!

पक्षश्रेष्ठींना कळविले आहे : खासदार कोल्हे

माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लोकांनी या चित्रपटातील माझ्या भूमिकेला विरोध केला तरी मला वैषम्य वाटणार नाही. कारण, ती राजकीय भूमिका आहे. या भूमिकेबाबत अनौपचारिकपणे मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे की या चित्रपटाचे शूटींग कधी झाले आहे. आता तो प्रदर्शनाला आलेला आहे आणि तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नथुराम गोडसे याचा रोल कोण करत आहे. त्यांनाच विचारा ते हा रोल का करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com