सोलापुरात ‘राष्ट्रवादी पुन्हा...’ : २३ जागा जिंकत पटकावला पहिला क्रमांक!

वैरागमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाला असून माजी मंत्री दिलीप सोपल यांना मोठा झटका बसला आहे.
ncp
ncpsarkarnama

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत गटबाजीमुळे चर्चेत असलेल्या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी (ncp) नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गुड न्यूज आली आहे. बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीला गेल्या काही निवडणुकीत पिछेहाट पहावी लागली आहे. मात्र, आजच्या नगरपंचायतीच्या निकालात ८५ जागांपैकी २३ जागा जिंकत राष्ट्रवादीने पहिला क्रमांक पटकावला आहे, त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हाची धून आजच्या निकालानंतर जागोजागी ऐकायला मिळाली. (NCP at number one winning 23 seats in Solapur district!)

माळशिस, माढा, वैराग, महाळुंग-श्रीपूर व नातेपुते या पाच नगरपंचायतींमधील 85 जागांपैकी सर्वाधिक 23 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपने (bjp) 15 जागा मिळवत दुसरा क्रमांक, तर कॉंग्रेसने (congress) 13 जागा जिंकत तिसरा क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात फक्त दोन जागांवर विजय मिळविता आलेला आहे. वैरागमध्ये शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने निवडणूक लढवली होती. मात्र, या ठिकाणी एकही उमेदवार विजय झालेला नाही, या ठिकाणी शिवसेनेचा दारुण पराभव झाला असून माजी मंत्री दिलीप सोपल यांना मोठा झटका बसला आहे.

ncp
मोहिते पाटलांनी वर्चस्व मिळवताच ‘शिवरत्न’वर झाली गुलालाची उधळण!

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजपला प्रत्येकी एक नगरपंचायत मिळाली आहे. स्थानिक आघाड्यांना दोन ठिकाणी संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीने निरंजन भूमकर यांच्या माध्यमातून वैराग नगरपंचायतीवर एकहाती झेंडा फडकावला आहे. जिल्ह्यातील पाचपैकी एक नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. वैरागमध्ये 13, माढा व माळशिरस नगरपंचायतमध्ये प्रत्येकी 2 व महाळुंग-श्रीपूरमध्ये सहा जागा, अशा एकूण 23 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत.

ncp
देहूतील विजयामुळे पिंपरी राष्ट्रवादीच्या अंगात संचारले १० हत्तीचे बळ आणि केला हा दावा....

भाजप हा जिल्ह्यात दोन नंबरचा पक्ष ठरला असून भाजपच्या 15 जागा विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये माळशिरस नगरपंचायतीमधील 10 जागा आहेत. माळशिरस नगरपंचायतीवर भाजपचा एकहाती झेंडा फडकला आहे. वैरागमध्ये चार व महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीत एक अशा एकूण 15 जागांवर भाजप विजया झाला आहे.

ncp
आमदार गोरे गटाचा धुव्वा : दहिवडीत राष्ट्रवादीच्या देशमुखांची जादू चालली!

कॉंग्रेसला माढा नगरपंचायतीच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली आहे. कॉंग्रेसचे जिल्ह्यात एकूण 13 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यातील 12 नगरसेवक एकट्या माढ्यातील आहेत. दादासाहेब साठे यांच्या माध्यमातून माढा नगरपंचायतीवर कॉंग्रेसचा एकहाती झेंडा फडकला आहे. कॉंग्रेसचा एक नगरसेवक महाळुंग-श्रीपूरमध्ये विजयी झाला आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून शिवसेनेच्या फक्त दोन जागा विजयी झाल्या अहेत. या दोन्ही जागा माढा नगरपंचायतीमधील आहेत.

ncp
नवरा, बायको दोघेही निवडून आले, अन् राष्ट्रवादीने खाते उघडले...

तब्बल १९ ठिकाणी अपक्ष विजयी!

पाच नगरपंचायतीच्या निवडणुकीत तब्बल 19 अपक्ष विजयी झाले आहेत. त्यात महाळूंग-श्रीपूरमध्ये 9, तर नातेपुते येथील 6 जणांचा समावेश आहे. प्रमुख राजकीय पक्ष विरुध्द स्थानिक आघाड्या व अपक्ष असा नातेपुते, माळशिरस व महाळुंग-श्रीपूर येथे सामना झाला. स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवार पॉवरफुल्ल ठरले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून माळशिरस नगरपंचायतीत 2, माळशिरस नागरी आघाडीच्या माध्यमातून नातेपुते येथे 11 नगरसेवक विजयी झाले आहेत. आगामी काळात होणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक असो की भविष्यात होणारे पक्षांतर यासाठी चकवा देणाऱ्या राजकारणाची सुरुवात नगरपंचायतीच्या माध्यमातून झाल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com